नगर : महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.त्यानंतर फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी विधान भवनावर जाऊन राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांच्यासमोर सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत उद्या होणारा शपथविधी व सत्तास्थापनेबाबतची माहिती दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या, तसेच एकनाथ शिंदे व अजित पवारांनी एकमेकांना चिमटे काढलेत.
नक्की वाचा : ठरलं तर मग!देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे व अजित पवारांनी घेतली एकमेकांची फिरकी (Ajit Pawar)
दरम्यान,यावेळी तुम्ही उद्या शपथ घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता,एकनाथ शिंदे म्हणाले, “थोडं थांबा,संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळेल”. तर,अजित पवार म्हणाले, “थोडी कळ काढा, त्यांचं संध्याकाळी समजेल,मी तर उद्या शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही”.अजित पवारांच्या या वक्तव्यावर शिंदे यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “अजितदादांना अनुभव आहे. त्यांना संध्याकाळी शपथ घेण्याचा, त्याचबरोबर सकाळी शपथ घेण्याचा देखील अनुभव आहे”. शिंदेंच्या या टिप्पणीवर अजित पवार कुरघोडी करत म्हणाले, “मागच्या वेळी आम्ही दोघांनी सकाळी शपथ घेतली होती. परंतु, त्यावेळी सरकार चालवायचं राहिलं होतं. यावेळी पुढच्या पाच वर्षांसाठी सरकार चालवणार आहोत”.
अवश्य वाचा : पंजाबच्या सुवर्णमंदिरात थरार!सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार
एकनाथ शिंदे काय म्हणाले?(Ajit Pawar)
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “सगळ्यांनी थोडी कळ काढा. संध्याकाळपर्यंत सगळ्यांच्या मनातला गोंधळ दूर होईल. उद्या पाच वाजता शपथविधीला हजर व्हा. तिथे तुम्हाला सगळ्या बातम्या मिळतील. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शिफारस केली होती. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही शिफारसपत्र दिलं आहे. मी साधा गावी गेलो तरी तुम्ही तुमच्या चर्चा चालवत असता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा मला आनंद आहे”..