नगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या प्रचारार्थ काल कण्हेरी येथे शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा पार पडली. या सभेमध्ये शरद पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रडण्याची आणि भावनिक होण्याची नक्कल केली. शरद पवारांनी अजित पवारांची केलेल्या नक्कलेचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला. अशातच शरद पवारांनी केलेल्या ‘नक्कले’वर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
नक्की वाचा : राज्यभरात थंडीची चाहूल,हवामान विभागाचा अंदाज
‘साहेबांनी अशी नक्कल करणं अनेकांना आवडलं नाही’ (Ajit Pawar)
अजित पवार यावेळी म्हणाले की, तो त्यांचा अधिकार आहे. पवार साहेबांना ज्या उंचीवर देश, महाराष्ट्र बघतो. एक राष्ट्रीय नेता, एक प्रगल्भ नेता म्हणून त्यांना ओळखल जातं. ज्याने रात्रीचा दिवस करून साहेबांना सतत सर्वत्र नेलं, सर्व मतदारसंघ सांभाळला. त्याठिकाणी एक सभा साहेब घ्यायचे आणि त्यावर निवडणूक व्हायची. साहेबांनी अशी नक्कल करणं अनेकांना आवडलं नाही,असं अजित पवार म्हणालेत.
अवश्य वाचा : सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!
इतके दिवस वाटायचं फक्त राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेबही दिसले (Ajit Pawar)
पुढे अजित पवार म्हणाले, युगेंद्र पवारांनी नकल केली असती, आणखी कोणी केली असती, तर ते ठिक होतं. मी रुमाल काढला, त्यांनी ही रूमाल काढला. त्या दिवशी माझ्या आई, वडिलांचं नाव घेतल्यानंतर मी भावनिक झालो. पण,मी थोडा थांबलो, पाणी पिलो आणि विषय बदलला. माणूस आहे, भावना असतात त्यामुळे भावनिक होतो, कायमच कठोर असतो,असं नाही. कधीकधी असं होतं, पंरतू ते नैसर्गिक पध्दतीने झालं. इतके दिवस वाटतं होतं, फक्त राज ठाकरे नक्कल करतात, पण आता दुसरं आणखी एक जण समोर आलं, मला वाईट वाटलं, दु:ख झालं की, साहेबांना दैवत मानलं. त्यांनी माझी नक्कल करावी, आम्ही लहानाचे मोठे त्यांच्यासमोर झालो. कधी कमी पडलो नाही, असंही अजित पवार पुढे म्हणाले आहेत.