Ajit Pawar:’तुम्ही सरकारमध्ये असताना देवळात वाजवण्याची घंटा ही दिली नाही’-अजित पवार 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यावर तुम्ही टीका करताय.पण तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हा काय केलं? देवळात वाजवण्याची घंटा ही दिली नाही, असं अजित पवार म्हणालेत.

0
Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit pawar: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यावर तुम्ही टीका करताय.पण तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हा काय केलं? देवळात वाजवण्याची घंटा ही दिली नाही, असं अजित पवार म्हणालेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या ‘जनसन्मान यात्रा’ (Jansanman Yatra) करत आहेत. आज या यात्रेचा तिसरा दिवस असून सिन्नरमध्ये ही यात्रा आहे. यावेळी अजित पवारांनी ‘लाडकी बहिण योजने’वर (Mazhi Ladki bahin Yojana) टीका करणाऱ्या विरोधकांना हे उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा : “मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार”;देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

‘विश्वासाला तडा जाऊ देणार नाही’- अजित पवार (Ajit Pawar)

अजित पवार यावेळी म्हणाले की,आजपर्यंत बांधल्या नाहीत, तेवढ्या राख्या गेल्या तीन दिवसांत बांधल्या आहेत. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आर्थिक शिस्त आम्हाला कळते. १० वर्ष अर्थसंकल्प सादर करणे हे येड्या गबळ्याचं काम नाही. खोट का सांगतात, माहिती घ्या आणि बोला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दमण गंगा पिंजाळ प्रकल्पाना मंजुरी देण्याचा प्रयत्न आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. राज्यातील मुला- मुलींना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी आता इथे आलो तेव्हा रथात बसलो तेव्हा लग्नात नववधू आणि नवरदेवाला बसवतात तसं बसलो. आम्ही लग्नात घोड्यावर ही बसलो नव्हतो ते आता पुरे करून घेतलं, अशी मिश्किल टिपण्णीही अजित पवार यांनी यावेळी केली.

अवश्य वाचा : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा;ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

अजित पवारांचा सिन्नर वासियांना शब्द (Ajit Pawar)


राज्यातील यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काय कामे केली हे सांगत आहे. भांगरे यांच्या स्मारकासाठी मागणी केली आहे. त्याची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे ते कसे पूर्ण होईल, यासाठी लक्ष देणार आहे. सिन्नरची वसाहत आहे, चांगल्या पैकी सुरू आहे, मात्र अडचणी आहेत. सोमवार ते गुरुवार राज्याच्या दौऱ्यावर आहे. आज मागण्यांसाठी जे निवेदन दिले आहेत. त्या संदर्भात सोमवारी तयारी करा, मंगळवारी जे जे प्रश्न मांडले ते सोडविण्यासाठी बैठक घेणार आहे, असा शब्द अजित पवारांनी सिन्नरकरांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here