Ajit Pawar:’बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा’-अजित पवार  

0
Ajit Pawar:'बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा'-अजित पवार  
Ajit Pawar:'बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा'-अजित पवार  

नगर : बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. तसेच सुप्रिया सुळे यांचा देखील मोठा वाटा असल्याचे अजित पवार म्हणाले. बारामतीचा (Baramati) मतदार माझा परिवार आहे. काल महायुतीच्या प्रचाराचा नारळ आम्ही फोडला.आमचा युतीचा जाहीरनामा (Manifesto) येणार आहे. पण पक्षाचा जाहीरनामा येत आहे. ज्या भागात आमचे उमेदवार आहेत, तिथं वेगळे जाहिरनामे असतील. महाराष्ट्रमधील सगळ्यात जास्त निधी बारामतीत आणल्याचे अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा : लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? – देवेंद्र फडणवीस

बारामतीला पहिले सौरऊर्जा शहर बनवण्याचा प्रयत्न (Ajit Pawar)

अजित पवार यावेळी म्हणाले, बारामतीला पहिले सौर ऊर्जा शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच कॅन्सर हॉस्पिटल आणि लॉजिस्टिक पार्कही उभारणार आहे. शिक्षण,दर्जेदार रस्ता,शेतीच्या विकासाचा वादा, सामाजिक विकासाचा वादा पूर्ण करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. आम्ही दिलेली आश्वासने सांभाळता येण्यासारखी आहेत. कुठं आपल्याला बचत करता येईल ते पाहण गरजेचं असल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्र सरकार त्यांच्या विचाराचे नसल्याने त्यांच्याकडून मदत जास्त मिळणार नाही. आमचं सरकार असल्यावर केंद्राकडून जास्त निधी मिळेल,असेही अजित पवार म्हणाले.

अवश्य वाचा : खास रे टीव्हीची खास निर्मिती;’वर्गमंत्री’वेब सीरिजचा ट्रेलर लॉन्च

समोरच्या उमेदवाराला स्ट्रॉंगच समजतो (Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले की, मला पक्षाने सांगितले इथे उभा राहा. माझ्या समोर कोणतरी उभं राहणार आहे. मी लढू शकत नाही का? जेव्हा निवडणुकीमध्ये उतरतो तेव्हा समोरचा उमेदवार स्ट्रॉंग आहे असं म्हणूनच लढत असतो. साहेबांनी कौतुक केलं की चांगलं वाटतं असे अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here