Nilesh Lanke : नीलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये ;अजित पवारांचा इशारा 

नीलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार,असा सज्जड दमच अजित पवारांनी लंकेंना दिला आहे. शरद पवारांसोबत जायचं असेल तर लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असंही ते म्हणाले.

0
Nilesh Lanke
Nilesh Lanke

नगर : नीलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार,असा सज्जड दमच अजित पवारांनी (Ajit Pawar) लंकेंना दिला आहे. शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जायचं असेल तर लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असंही ते म्हणाले. अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके हे अजित पवारांना सोडून शरद पवार गटाची साथ देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत. त्यावर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नक्की वाचा : नगरचं नाव बदलल्यावर गोपीचंद पडळकर म्हणाले…

नीलेश लंके हे शरद पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा (Nilesh Lanke)

लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पारनेरचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर या आधीही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. नीलेश लंके असं काही करणार नाहीत असं ते म्हणाले होते. त्यानंतर बुधवारी आमदार नीलेश लंके यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तरी देखील या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही.

नीलेश लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल – अजित पवार (Nilesh Lanke)

आमदार नीलेश लंके यांनी चुकीची भूमिका घेऊ नये, आणि घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार असं अजित पवार म्हणाले. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर पक्षांतरबंदी कायद्यान्वये आमदारकी जाते असं अजित पवार म्हणाले. नीलेश लंके यांनी जर शरद पवारांची साथ द्यायचं ठरलं तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हिप सर्वाना लागू आहे, त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतली तर त्यांची आमदारकी जाणार असा इशाराच अजित पवारांनी दिला.नीलेश लंके हे त्या ठिकाणच्या स्थानिक राजकारणावर नाराज असल्याची माहिती असून आपण त्यामध्ये लक्ष घालणार असल्याचंही ते अजित पवार म्हणाले.

अवश्य वाचा : भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here