Akashvani : अन्यथा आकाशवाणी केंद्राला टाळे ठोकू : अभिजीत खोसे

Akashvani : अन्यथा आकाशवाणी केंद्राला टाळे ठोकू : अभिजीत खोसे

0
Akashvani : अन्यथा आकाशवाणी केंद्राला टाळे ठोकू : अभिजीत खोसे
Akashvani : अन्यथा आकाशवाणी केंद्राला टाळे ठोकू : अभिजीत खोसे

Akashvani : नगर : शहराचे नामकरण आता अहिल्यानगर (Ahilyanagar) झाले आहे. तरी ही आकाशवाणी (Akashvani) केंद्राकडून सध्या जुन्या नावाचा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने जिल्ह्याच्या नावाबाबत सुधारणा करावी. अन्यथा आकाशवाणी केंद्राला टाळे ठोकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्याध्यक्ष अभिजित खोसे (Abhijit Khose) यांनी दिला आहे. याबाबत आकाशवाणीचे सहाय्यक निदेशक मानसी गारुडकर यांना निवेदन दिले.

नक्की वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आकाशवाणीकडून जुन्या नावाचा उल्लेख (Akashvani)

यावेळी जय भोसले, केतन क्षीरसागर, सुमित कुलकर्णी, महेंद्र उपाध्ये, राजूनाना तागड़, तुषार यादव, मयूर सोमवंशी, रोहित सरना आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापालिकेने बदलाबाबत सर्वत्र माहिती दिलेली आहे. तरी देखील नगर शहर व जिल्हयाचा उल्लेख करताना आकाशवाणीकडून जुन्या नावाचा उल्लेख केला जातो, असा आरोपही त्यांनी केला आहे.