Akhil Bhartiya Grahak Panchayat : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या कोषाध्यक्षपदी विलास जगदाळे

Akhil Bhartiya Grahak Panchayat : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या कोषाध्यक्षपदी विलास जगदाळे

0
Akhil Bhartiya Grahak Panchayat : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या कोषाध्यक्षपदी विलास जगदाळे
Akhil Bhartiya Grahak Panchayat : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या कोषाध्यक्षपदी विलास जगदाळे

Akhil Bhartiya Grahak Panchayat : नगर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची (Akhil Bhartiya Grahak Panchayat) मध्य महाराष्ट्र प्रांताची बैठक पुणे (Pune) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे  केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच मध्य महाराष्ट्र प्रांताचे क्षेत्रीय पालक सूर्यकांत पाठक, मध्य महाराष्ट्र प्रांताचे क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे यांच्या उपस्थितीमध्ये  नवनियुक्त प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी मध्य महाराष्ट्र प्रांताच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या. त्यामध्ये मध्य महाराष्ट्र प्रांताच्या कोषाध्यक्षपदी अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील बाभुळवाडेचे विलास जगदाळे (Vilas Jagdale) यांची निवड करण्यात आली. या निवडीचा कालावधी तीन वर्षांचा आहे.

अवश्य वाचा : गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला

जगदाळे हे अनेक वर्षांपासून ग्राहक पंचायतीचे काम पाहतात

मध्य महाराष्ट्र प्रांतामध्ये अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर  असे दहा जिल्हे व पुणे,कोल्हापूर दोन महापालिका येतात. मध्य महाराष्ट्र प्रांताच्या नियुक्त्या या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. विलास जगदाळे हे ३० ते ३२ वर्षांपासून ग्राहक पंचायतीचे काम करत आहेत. आजपर्यंत त्यांनी तालुका संघटक या पदापासून तालुका अध्यक्ष, जिल्हा सहसंघटक, जिल्हा संघटक, जिल्हा अध्यक्ष, मध्य महाराष्ट्र प्रांत सहसचिव, पर्यावरण आयाम प्रमुख म्हणूनही काम केले आहे. त्यांची शाळा कॉलेजेस मध्ये शेकडो व्याख्याने, चर्चासत्र  झालेली आहेत.

नक्की वाचा : मोठी बातमी! मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून ५ जणांचा मृत्यू

वीज ग्राहकांचे प्रश्न सोडवण्याचे काम (Akhil Bhartiya Grahak Panchayat)

विलास जगदाळे यांना जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी १९९९ व २००१ या दोन वर्षांमध्ये ग्राहक सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. अहिल्यानगर आकाशवाणी मध्ये  आजपर्यंत ३० पेक्षा जास्त वेळेस वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, चर्चासत्रामध्ये सहभाग घेतलेला आहे. चार वेळेस नगर सह्याद्री वरती ही चर्चा सत्रात सहभाग आहे. महावितरणच्या ऊर्जा मित्र बैठकीमध्येही वीज ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात बरेच वर्षे काम केलेले आहे. विलास जगदाळे हे  केदारेश्वर देवस्थान सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत.

मध्य महाराष्ट्र प्रांत नूतन कार्यकारिणी
१) बाळासाहेब औटी :- प्रांत अध्यक्ष
२)संदीप जंगम :- प्रांत संघटन मंत्री
3) डॉ. अनिल देशमुख :- प्रांत सचिव
4) विलास जगदाळे :- प्रांत कोषाध्यक्ष  
5) वंदना तोरवणे  :- प्रांत उपाध्यक्ष
6) राजश्री दिक्षित  :-  प्रांत उपाध्यक्ष
7)दिपक इरकल :- सह सचिव
8) ऍड तुषार झेंडे :- सह सचिव
9) ज्ञानेश्वर उंडे :- सह कोषाध्यक्ष
10) विलास लेले :- प्रांत कार्यालयीन प्रमुख
11) प्रसाद बुरांडे :- प्रांत कार्य. सदस्य
12) विनोद भरते :- प्रांत कार्य. सदस्य
13) उर्मिला येळगावकर :- प्रांत कार्य. सदस्य
14) भारती अग्रवाल :- प्रांत कार्य. सदस्य
15) शुभदा नागपूरकर :- प्रांत कार्य. सदस्य
16) सर्जेराव सूर्यवंशी :- प्रांत कार्य. सदस्य
17) अतुल कुऱ्हाडे :- प्रांत कार्य. सदस्य
18) जयदीप ठुसे :- प्रांत कार्य. सदस्य
19) किरण जाधव :- प्रांत कार्य. सदस्य
20) अॅड सुप्रिया दळवी :- प्रांत कार्य. सदस्य
21) भानुदास सरडे :- प्रांत कार्य. सदस्य

आयाम प्रमुख:-
 
22) नयना आभाळे :- महिला आयाम प्रमुख .
23) डॉ. प्रशांत ठाकरे :- प्रचार आयाम प्रमुख  
24) श्रीकांत जोशी :-  विधी आयाम प्रमुख
25) केदार नाईक :- पर्यावरण आयाम प्रमुख
26) विजय मोहरीर :- रोजगार सृजन आयाम प्रमुख  
27) एन ए कुलकर्णी :- रोजगार सृजन आयाम प्रमुख