Akola : बापरे ! जळगावनंतर अकोल्यातही कलम 144 लागू

Akola : बापरे ! जळगावनंतर अकोल्यातही कलम 144 लागू

0
Akola
Akola

Akola : नगर : दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे’ पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली आहे. जमावबंदी लागू करण्यामागचे कारण म्हणजे अकोल्यात 45.06 अंश एवढं तापमान (Summer) नोंदवण्यात आलं आहे. या वाढलेल्या तापमानामुळे होणारे उष्माघात व नागरिकांच्या आरोग्यासाठी उपाययोजना म्हणून याचा आवलंब केला आहे. अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यातही तापमानाचा कहर पाहायला मिळत असून तेथील जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यात 144 कलम लागू केले आहे. मात्र, 144 लागू करणे म्हणजे संचारबंदी किंवा लॉकडाऊन (Lockdown) नाही, असेही ते म्हणाले.

हेही पहा : निवडणूक आयोगाने ईव्हीएम मध्ये घोटाळा केला; तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही : माजी मंत्री सुबोध सावजी

अकोला जिल्ह्याचे तापमानाचा 44 ते 45.8 पर्यंत (Akola)

अकोला जिल्ह्यातील तापमानाचा पारा 44 ते 45.8 अंश सेल्सियसपर्यंत आहे. उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे व अन्य उपाय योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 25 मे रोजीच्या दुपारी 4 वाजेपासून ते 31 मेपर्यंत फौजदारी प्रक्रीयात संहिताचे कलम 144 चे आदेश करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Akola
Akola

नक्की वाचा : सुपा-पारनेर रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणावर हातोडा

उपायोजना करण्याच्या सूचना (Akola)

जिल्हाधिदंडाधिकारी कुंभार यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंगमेहनत करणारे कामगार आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी ठेवणे, याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांची राहणार आहे. याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित ग्राम पंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, पोलिस प्रशासन, कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल. खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सकाळी 10 वाजतापर्यंत व सायंकाळी 5 नंतर कोचिंग सेंटर चालवावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here