Akole : कळस बुद्रुक येथे ‘धमाल मेळावा’ उत्साहात

Akole : कळस बुद्रुक येथे 'धमाल मेळावा' उत्साहात

0
Akole : कळस बुद्रुक येथे 'धमाल मेळावा' उत्साहात
Akole : कळस बुद्रुक येथे 'धमाल मेळावा' उत्साहात

Akole : अकोले: जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समितीच्या राष्ट्रीय पोषण अभियान 2024 अंतर्गत महिला बालकल्याण विभागाच्यावतीने (Women & Child Welfare Department) अकोले (Akole) तालुक्यातील कळस येथे आयोजित धमाल मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे यांच्या उपस्थितीत पार पडले.

नक्की वाचा: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी!आता फक्त ९९ रुपयांना मिळणार आवडीचा ब्रँड

यांची उपस्थिती

कळस बुद्रुक येथील सभागृहामध्ये अंगणवाडीच्यावतीने आयोजित या मेळाव्यास अकोलेचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सरपंच राजेंद्र गवांदे, माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, नामदेव निसाळ, गोरख वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, महिला कल्याण विकास अधिकारी मीना चव्हाण, पर्यवेक्षिका कांता गिरी, अर्चना एखंडे, सोनाली कुळधरण, सुरेखा मुतोंड, ज्योती कोकाटे आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा: ‘धर्माचं भांडवल करु नका’,इंदुरीकर महाराजांकडून राजकारण्यांची कानउघडणी

विविध खेळातून आनंदीदायी जीवनासाठी मेळावा (Akole)

सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत या अभियानांतर्गत शून्य ते सहा वयोगटातील मुले-मुली व पालकांसाठी आनंद धमाल मेळाव्यात भविष्याचे झाड, जादूची गुहा, संवेदनशील पालकत्व, मेंदूचे जाळे, खेळणी, लसीकरण, उंची मोजणे, साप सीडी, तोंडात घास, सेल्फी जागा, पाण्याचा खेळ असे अनेक विविध खेळ यातून बालक हे सुदृढ होवून आकलनशक्ती वाढेल आणि त्याचे जीवन आनंदीदायी होईल, यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका मालती गोसावी, आशा ढगे, संगीता वैराट, शांता गजे, मनीषा वाकचौरे, संगीता जाधव, लहानबाई गोरे, शैला आल्हाट आदिंनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here