Akole : अकोले : अकोले तालुका पुरोगामी चळवळीच्यावतीने येथील मराठी मुलांची शाळा प्रांगणात ११ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान ‘ शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून ही व्याख्यानमाला बंद होती, यावर्षी पुन्हा वैचारिक मेजवानी सुरू होत असल्याने तालुक्यातील समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा : कोपरगाव शहरातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास
यांची व्याख्याने
या व्याख्यानमालेची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार व रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांच्या व्याख्यानाने होणार असून ते ‘शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. ११ एप्रिलला होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बबन महाले तर स्वागताध्यक्ष प्रा. बाळासाहेब मेहेत्रे असतील. १२ एप्रिलला नव्या पिढीतील प्रभावी कवी डॉ. स्वप्नील चौधरी ‘चल दंगल समजून घेऊ’ या विषयावर कवितांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक महाराज केदार असून डॉ. सखाराम घनकुटे स्वागताध्यक्ष असतील.
नक्की पहा : नवऱ्याकडून पत्नीचा पेट्रोल पंपावर गळा चिरून खून; एका तासात आरोपी ताब्यात
यांची उपस्थिती (Akole)
व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी कीर्तनकार श्यामसुंदर महाराज सोन्नर ‘समतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय आणि आजचा महाराष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी संपत महाराज भोर तर स्वागताध्यक्ष भाऊराव उघडे असतील. १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘संघम् शरणम् गच्छामी’ हे त्यांच्या जीवनकार्यावर आधारित महानाट्य सादर केले जाणार आहे. हैदराबाद येथील अभ्युदय कला अकादमीचा २१ कलाकारांचा संच हे नाट्य सादर करणार असून या महानाट्याचे देशभरात ८००हून अधिक प्रयोग झाले आहेत. या नाट्यात प्रसिद्ध अभिनेते जग्गाराजू यांनी डॉ. आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय वाकचौरे असतील तर अयाज शेख स्वागताध्यक्ष असणार आहे.



