Akole Assembly Constituency : अकोले विधानसभा मतदारसंघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Akole Assembly Constituency : अकोले विधानसभा मतदारसंघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

0
Akole Assembly Constituency : अकोले विधानसभा मतदारसंघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
Akole Assembly Constituency : अकोले विधानसभा मतदारसंघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Akole Assembly Constituency : अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघातील (Akole Assembly Constituency) १ हजार ३७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण सत्र पार पडले. या प्रशिक्षण सत्रास आणि ईव्हीएम (EVM) स्ट्रॉंगरूमला जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

नक्की वाचा : सेवावृत्तीने फक्त आणि फक्त मातृभूमी नगरसाठीच पूर्णवेळ काम करण्याची माझी भूमिका : संग्राम जगताप

प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण

द्वारकामाई मंगल कार्यालय येथे अधिकारी – कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. दुपारच्या सत्रात अगस्ती विद्यालय येथे घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण सत्रास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत अधिकारी – कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मतदान यंत्र हाताळणीबाबत उपयुक्त सूचना दिल्या. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : विकासकामे न करता विरोधकांचे वेगळ्याच विषयावर राजकारण : मोनिका राजळे

मतदान टक्केवारी अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन (Akole Assembly Constituency)

यावेळी मतदान केंद्राध्यक्ष यांची निर्देशक पुस्तिका, केंद्राध्यक्ष दैनंदिनी, विविध माहिती भरणे, मतदान टक्केवारी अर्ज भरण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यादव यांनी मार्गदर्शन केले. अगस्ती विद्यालयातील एकूण १५ प्रशिक्षण कक्षामध्ये प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळणीचे अधिकारी – कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. याठिकाणी पोस्टल मतदानाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.