Akole News : सहा वर्षाच्या मणिकर्णिकाची ‘केदारकंठ’ शिखराला गवसणी 

0
Akole News : सहा वर्षाच्या मणिकर्णिकाची 'केदारकंठ' शिखराला गवसणी 
Akole News : सहा वर्षाच्या मणिकर्णिकाची 'केदारकंठ' शिखराला गवसणी 

अकोले : मनातली जिद्द,आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती जर आपल्याजवळ असेल तर अशक्य गोष्ट ही शक्य होत असते. याचीच प्रचिती मुळची अकोलेकर (Akole News) असलेली आणि सध्या नाशिकमध्ये राहत असलेल्या मणिकर्णिका देशपांडे (Manikarnika Deshpande) हिच्या कर्तृत्वाने आली आहे. तिने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील केदारकंठ हे शिखर (Kedarkantha Peak) सर केलं आहे.

नक्की वाचा: भारतात लॉकडाऊन लागणार का ? नेमकं सत्य काय?

मणिकर्णिका नेमकी कोण ? (Akole News)

नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित, शिशु विहार मराठी माध्यमाची मोठ्या गटातील मणिकर्णिका विद्यार्थिनी आहे. मणिकर्णिका प्रवर मोनिका देशपांडे हिने उत्तराखंड राज्यातील केदारकंठ हे शिखर १९ ते २० मार्च, २०२६ या कालावधीत सर केले. १२,५०० फूट एका बाजूने तर जाऊन येऊन २५,००० फूट समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी हा विक्रम करणारी ती भारतातील पहिली मुलगी ठरली आहे. यापूर्वी हे शिखर एका आठ वर्षाच्या मुलीने आणि सातवर्षीय मुलाने सर केले आहे. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितिचा सामना यावेळी मणिकर्णिकाने केला.

ट्रेकिंगच्या सुरुवातीला मणिकर्णिकाला तिचे वय लहान असल्याने चढाई करण्यास मनाई करण्यात येत होती. मात्र, तिची दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे कोणाचे काहीही चालेना. अखेर तिला परवानगी देण्यात आली. त्यात प्रचंड वेगाने वाहणारे वारे, पाऊस, हिमवर्षाव, हिमालयीन प्राणी यांचा सामना तिला करावा लागला. मात्र, अत्यंत चिकाटी व सहनशक्ती यांच्या जोरावर तिने हे यश संपादित केले. 

अवश्य वाचा: आता गरजू कुटुंबाला मिळणार प्रत्येकी ३ लिटर रॉकेल ; जिल्ह्यासाठी २१६ किलोलिटर साठा मंजूर

मणिकर्णिकाचं यश ठरलं राष्ट्रीय विक्रम (Akole News)

मणिकर्णिकाचे हे यश आजवरचा राष्ट्रीय विक्रम आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. माणिकर्णिका ही अकोले येथील हिंद सेवा मंडळ संचालित मॉडर्न हायस्कूलचे माजी प्राचार्य स्व.अनंत देशपांडे यांची पणती तर सेवा निवृत्त प्राचार्य शिरीष व चंद्रशेखर देशपांडे यांची नात आहे. यासाठी तिला संस्था व शाळा यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले वातावरण, शिवम जाधव, रोहित पातळे,द सरचिंग सोल या कंपनीचे ट्रेक लीडर अभिषेक रावत व राममोहन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सहा वर्षीय मुलीने दाखवलेल्या धाडसातुन हे एक गोष्ट नक्की शिकता येऊ शकते की, मनात इच्छा असेल ना तर एखादी कठीण गोष्ट करण्यासाठी वय कुठेही आडवे येत नाही.