Akshay Kardile : राजमाता अहिल्यादेवी होळकर  यांचे विचार समाजाला प्रेरणादायी व आदर्शवंत : अक्षय कर्डिले

Akshay Kardile : राजमाता अहिल्यादेवी होळकर  यांचे विचार समाजाला प्रेरणादायी व आदर्शवंत : अक्षय कर्डिले

0
Akshay Kardile : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजाला प्रेरणादायी व आदर्शवंत : अक्षय कर्डिले
Akshay Kardile : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजाला प्रेरणादायी व आदर्शवंत : अक्षय कर्डिले

Akshay Kardile : नगर : राजमाता अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे विचार समाजाला प्रेरणादायी व आदर्शवंत आहे. त्यांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी समाजामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म आपल्या जिल्ह्यामध्ये झाला आहे. त्यांचे नाव देखील आपल्या जिल्ह्याला दिले आहे नगर दक्षिण भाजपतर्फे (BJP) बुधवारी (ता. २६) सकाळी दहा वाजता सहकार सभागृह येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी दिली.

अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया

नगर दक्षिण भाजपातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनानिमित्त नगर दक्षिण भाजपातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजनाच्या बैठकीत बोलताना भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग समवेत बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, दादाभाऊ चितळकर,अण्णासाहेब बाचकर, मधुकर मगर, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, राम पानमाळकर, डी. आर. शेंडगे, सुधीर भापकर, बाबासाहेब खडसे, दीपक कार्ले, दादा दरेकर, सुभाष निमसे‌, भैय्या लांडगे, हर्षल म्हस्के, गणेश भालसिंग आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे

अक्षय कर्डिले म्हणाले, (Akshay Kardile)

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसे च विविध मान्यवर कर्जत तालुक्यातील चौंडी येथे ३१ मे रोजी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती अक्षय कर्डिले यांनी दिली.

दिलीप भालसिंग यांनी सांगितले की, नगर दक्षिण भाजपाच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे.तसेच दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा गावाच्या विकासासाठी योगदान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.