Akshay Kardile: अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी 

अक्षय कर्डिले यांचा विजय आजच निश्चित

0

Akshay Kardile:राहुरी: गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी रक्ताचे पाणि करुन एक एक माणूस जोडण्याचे काम केले. त्यांच्या आर्शिवादाने आज एवढी माणसे माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळेच मला भाजपाकडून उमेदवारी मिळाली, असे प्रतिपादन राहुरी विधानसभेचे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी केले. राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणूकीसाठी भाजपकडून आज युवा नेते अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यानिमित्त आज (ता.१) स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या राहुरी येथील संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी (Fireworks display) व पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला, यावेळी ते बोलत होते.

अवश्य वाचा- आता झेडपी शाळेत प्रवेशावर मिळणार ‘ही’ मोठी सवलत

अक्षय कर्डिले यांचा विजय आजच निश्चित (Akshay Kardile)

याप्रसंगी अमोल भनगडे म्हणाले, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आज भाजपाकडून राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघातील पोटनिवडणूकीसाठी युवा नेते अक्षय कर्डिले यांचे नाव अधिकृत घोषित करण्यात आले. येणाऱ्या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांचा विजय आजच निश्चित झाला आहे, असे मत भनगडे यांनी व्यक्त केले. या निवडणुकीत अक्षय कर्डिले हे भरघोस मतांनी विजय होणार, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रकाश पारख, रविंद्र म्हसे, राजेंद्र दरक, गणेश खैरे, सतिष फुलसौंदर, सचिन मेहेत्रे, राजेंद्र गोपाळे, युवराज गाडे, किशोर येवले, उमेश शेळके, कुलदिप पवार, दिपक वाबळे, सुभाष गायकवाड, सुनिल पवार, शिवाजी डौले, अण्णासाहेब बाचकर, प्रतिक बोबडे, नयन शिंगी, कांतीलाल जगधने, अक्षय भुजाडी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.