Akshay Kardile : अक्षय कर्डिले सोमवारी अर्ज दाखल करणार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील राहणार उपस्थित

Akshay Kardile : अक्षय कर्डिले सोमवारी अर्ज दाखल करणार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील राहणार उपस्थित

0

Akshay Kardile : नगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप (BJP) पक्षाच्या वतीने उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) हे सोमवारी (ता. ६) शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज भरला जाणार आहे.

नक्की वाचा : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल

Akshay Kardile : अक्षय कर्डिले सोमवारी अर्ज दाखल करणार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील राहणार उपस्थित
Akshay Kardile : अक्षय कर्डिले सोमवारी अर्ज दाखल करणार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील राहणार उपस्थित

एकजुटीने निवडणूक लढवण्याचे आवाहन

स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे विजय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उमेदवार अक्षय कर्डिले यांनी केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आपला विजय निश्चित (Akshay Kardile)

यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की, माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेशी असलेले नाते कधीही तुटू दिले नाही. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि सुखदुःखात सहभागी होत विकासाची कामे केली. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा हा विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊकाम करणे गरजेचे आहे. या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या वडिलांसोबत काम केले आहे, त्यामुळे मला सांभाळून घ्या आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

बुऱ्हानगर येथे नियोजन बैठकीचे आयोजन

या पार्श्वभूमीवर बुऱ्हानगर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाती सूळ, बाजीराव गवारे, अशोक झरेकर, संदीप कर्डिले, देविदास कर्डिले, अरुण होळकर, दादाभाऊ चितळकर, शीलाताई खराडे, प्रयागा लोंढे, आनंदराव शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.