Akshay Kardile : राहुरी : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Rahuri Assembly By-election) रणधुमाळीला अखेर जोरदार सुरुवात झाली असून, भारतीय जनता पार्टी (BJP) महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या प्रचाराचा आज पूर्व भागातून श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कर्डिले समर्थकांनी दिला विजयाचा नारा
तांदुळवाडी येथे विधिवत नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करत कर्डिले समर्थकांनी विजयाचा नारा दिला. गावागावांत कॉर्नर सभांचा धडाका सुरू झाला असून मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला वेग देण्यात येत आहे. शनिवारी सकाळी वाघाचा आखाडा येथून प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर तांदुळवाडीत झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रचाराची आक्रमक सुरुवात (Akshay Kardile)
यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच दिवशी प्रचाराने घेतलेली आक्रमक सुरुवात पाहता, राहुरीच्या राजकीय मैदानात आता खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने वाटचाल दिसून येत असलेले स्पष्ट झाले आहे असं मत नागरिकांनी व्यक्त केले.



