Akshay Kardile : दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न: अक्षय कर्डिले

Akshay Kardile : दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न: अक्षय कर्डिले

0
Akshay Kardile : दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न: अक्षय कर्डिले
Akshay Kardile : दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न: अक्षय कर्डिले

राहुरीत हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध

Akshay Kardile : नगर : मतांच्या राजकारणासाठी (Politics) काही नेते कोणत्याही थराला जात असून समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतात. अशा प्रवृत्तीला महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही. शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांबाबत भाजपकडून (BJP) तीव्र आंदोलन सुरूच राहील, असे युवा नेते अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी नमूद केले.

नक्की वाचा: अजित पवारांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांकडून निधनाच्या दिवशीच सह्यांचा सपाटा; मुख्यमंत्र्यांना दिली स्थगिती

हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान बरोबर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरात भाजपच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शनि चौकापर्यंत निषेध रॅली काढत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पुतळा दहन करून जोडे मारत निषेध व्यक्त केला.

हे देखील वाचा : मालेगावमध्ये पुन्हा पेटला टिपू सुलतान वाद; पुन्हा फोटो लावणार असल्याचं उपमहापौरांचं वक्तव्य

शिवरायांच्या न्यायनिष्ठ राज्यकारभाराची ईतरांशी तूलना चूकीची (Akshay Kardile)

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्राच्या भावनांना ठेच देणारे असून ते अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे दैवत असून त्यांच्या कार्याची आणि पराक्रमाची तुलना कोणत्याही अन्य ऐतिहासिक व्यक्तीशी करणे महाराष्ट्रातील जनतेला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले, गुलामगिरीची साखळी तोडली आणि न्यायनिष्ठ राज्यकारभार उभा केला, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिला आहे.

Akshay Kardile : दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न: अक्षय कर्डिले
Akshay Kardile : दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न: अक्षय कर्डिले


या आंदोलनावेळी वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते सकल हिंदू समाज आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. शहरातील विविध भागातून कार्यकर्ते एकत्र येत घोषणाबाजी करत आंदोलनात सहभागी झाले. निषेध मोर्चामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी दादा सोनवणे, राजेंद्र उंडे, अरुण साळवे, प्रभाकर हरिचंद्र, सुनिल पवार,बाबासाहेब शिंदे, किशोर येवले, नयन शिंगी, सचिन मेहेत्रे, सदाशिव शेळके, अक्षय तनपुरे, अक्षय भुजाडी, गणेश खैरे, आण्णासाहेब शेटे, उमेश शेळके, मयुर गवळी, सचिन भोंगळ, राजेंद्र दरक, प्रकाश पारख कुलदिप पवार सुकुमार पवार, नारायण धोंगडे, राम शिंदे, कांतीलाल जगधने, विकास जगधने, संतोष जगधने, अरुण डौले, नितीन ढेरे, सतिश फुलसौदर, सागर येवले, कृष्णाजी होळकर, मच्छिंद्र गावडे, मारुती नालकर, निलेश शिरसाठ, नरेंद्र शेटे, यांसह कार्यकर्ते पदाधिकारी सकल हिंदू समाज शिवप्रेमी उपस्थित होते.