Akshay Kardile | राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर; अक्षय कर्डिले नेतृत्व सिद्ध करणार का?

0

Akshay Kardile | नगर : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या निधनामुळे राहुरीची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाने बारामतीची जागा रिक्त झाली होती. तेथे आता पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या नेतृत्वाची परीक्षा ठरणार आहे.

निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – श्रीगोंदा न्यायालयातील ‘लोकअदालत’ मध्ये आठ हजार प्रकरणांचा निपटारा

फोटो ओळखपत्र हा मुख्य पुरावा

मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार  मतदान २३ एप्रिल २०२६ रोजी होणार असून मतमोजणी ४ मे २०२६ रोजी केली जाणार आहे.

अवश्य वाचा – उन्हाळ्यात झपाट्याने वाढतयं वीज बिल? फक्त 5 ट्रिक्स ज्यामुळे लागेल ‘ब्रेक’

आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

जाहीर कार्यक्रमानुसार ३० मार्च २०२६ रोजी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ७ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल २०२६ आहे. त्यानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान पार पडेल. मतदानानंतर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ६ मे २०२६पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हे पहा – या समुद्रधुनीला ‘होर्मुझ हे नाव कसं पडलं? त्याचा नेमका अर्थ काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जागा बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा विरोधी पक्षांकडून व्यक्त केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदार संघाची निवडणूक बिनविरोध होईल का यावर उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. यातच युवा नेते अक्षय कर्डिले यांनाच भाजप उमेदवारी देणार असे भाजपचे जिल्हाध्यक्षांनी जाहीर केले आहे. ही निवडणूक अक्षय कर्डिले यांना आपले अस्थित्व व नेतृत्व सिद्ध करण्याची निवडणूक ठरणार आहे. या घटनाक्रमामुळे जिल्ह्यात राजकीय घटनाक्रमांना वेग आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here