
Akshay Kardile : नगर : पाथर्डी तालुक्यातील लोहसर व चिचोंडी शिराळ (Chichondi Shiral) गावात राजकीय वातावरणात मोठी हालचाल पाहायला मिळाली. अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या कार्याने प्रेरित होऊन शेकडो युवकांनी भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party) जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा पृथ्वीराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लोहसर गावातील युवकांनी एकत्र येत भाजपची विचारधारा स्वीकारली. यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, अक्षय कर्डिले यांनी केलेली विकासकामे, युवकांशी असलेला संवाद आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यामुळे आम्ही प्रभावित झालो. त्यांच्या कामातून प्रेरणा घेत आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
अवश्य वाचा : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात
राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर ठाम
या प्रसंगी बोलताना पृथ्वीराज आव्हाड यांनी युवकांच्या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, आजचा युवक विकास आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर ठाम आहे. अक्षय कर्डिले यांचे नेतृत्व आणि काम हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे. भविष्यात या माध्यमातून अधिकाधिक युवकांना संघटनेत जोडण्याचा आमचा प्रयत्न राहील.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संघटन मजबूत करण्याचा निर्धार (Akshay Kardile)
कार्यक्रमादरम्यान सर्व युवकांनी पक्षनिष्ठा व्यक्त करत संघटन मजबूत करण्याचा निर्धार केला. या मोठ्या प्रवेशामुळे पाथर्डी तालुक्यात भाजपची ताकद अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये याचा परिणाम दिसून येणार आहे.


