नगर : रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने (Dhurandhar Movie) रिलीज होताच धुरळा उडवला आहे. असं असलं तरी संपूर्ण चित्रपट एकीकडे आणि अक्षय खन्नाचा व्हायरल डान्स (Akshay Khanna Viral Dance) मात्र एकीकडे आहे. त्याचं कॅरेक्टर, डान्स हे सगळंच प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारं आहे. धुरंधर मध्ये रेहमान डकैतची भूमिका साकारणाऱ्या अक्षयवर एक गाणं चित्रित करण्यात आलं आहे. ते गाणं आणि अक्षयचा डान्स सध्या खूप गाजतोय. मात्र हे गाणं शूट करताना अक्षय खन्ना सोबत एक मोठा किस्सा (A Big Story) घडलाय तो काय ? हेच जाणून घेऊ…
नक्की वाचा: व्ही.शांताराम चित्रपटात जयश्रीच्या भूमिकेत दिसणार तमन्ना भाटिया;पोस्टर प्रदर्शित
अक्षय खन्नाचा व्हायरल डान्स कसा तयार झाला ? (Akshay Khanna Viral Dance)

धुरंधर चित्रपटातील एका सीनमध्ये अक्षय हा ‘शेर-ए-बलोच’ स्टाइलमध्ये अरबी स्टेप्स करतो, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र त्याचा हा डान्स एखाद्या कोरिओग्राफरने बसवला नव्हता. या सीनच्या वेळेस अक्षयने दिग्दर्शक आदित्य धरला विचारलं होतं की,तो स्वत:चं असं काही एक्स्ट्रॉ करू शकतो का ? आणि आदित्यने हो म्हणताच अक्षयचा हा गाजलेला डान्स तयार झाला. मात्र याच गाण्याच्या शूट दरम्यान अक्षयची तब्येत खूप बिघडली होती.
‘धुरंधर’ चं शूटिंग बऱ्याच वेगवेगळ्या लोकेशन्सवर करण्यात आलं आहे, ज्यात लडाखचाही समावेश आहे. मात्र लोकेशनवर पोहोचल्यानंतर अनेक गोष्टी अक्षयला सूट झाल्या नाहीत, त्यामुळे अक्षयला ऑक्सीजन मास्क लावूनच इथलं सगळं शूटिंग पूर्ण करावं लागलं. विशेषत: बलूचमधील लोकांना भेटण्याचा आणि डान्स करण्याच्या भागाचं शूटिंग तसंच पार पडलं. याबद्दल कोरिओग्राफर विजय गांगुलीने एक खास किस्सा शेअर केला आहे.
अवश्य वाचा: बाळाचे जीवन संपवून आई-वडिलांनी घेतले देवदर्शन;नेमकं प्रकरण काय ?
अक्षयने ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर लावून शूट केला सिन (Akshay Khanna Viral Dance)
कोरिओग्राफर गांगुली म्हणाले की, दिग्दर्शक आदित्य धर यांनी लडाखमध्ये बलुचिस्तानचा सेटअप केला होता. ही जागा सुंदर आहे. मात्र तिथे हाय-अल्टीट्युड सिकनेस खूप होतो. त्यामुळे जे लोक इथे फिरायला येतात किंवा शूटिंग करायला येतात, त्यांना पहिल्या दिवशी फक्त आराम करण्याचा सल्ला दिला जातो. अक्षय खन्नाही इथे पोहोचला, पण त्याला इथे त्रास झाला. त्यामुळे त्याला ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर लावूनच फिरावं लागलं. जेव्हा या गाण्याचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा त्याची ऑक्सीजन लेव्हल खूपच कमी झाली होती. त्यामुळे प्रत्येक शॉटनंचर तो ऑक्सीजन मास्क लावायचा.
गांगुली पुढे म्हणाले की, “धुरंधर”च्या “FA9LA” या गाण्यातील अक्षयचा जो डान्स खूप गाजतोय ना,तो डान्स स्वत:अक्षयनेच बसवला. अक्षय खन्नाला त्या सीनमध्ये आत यायचं होतं,डान्सर्समधून जात पुढे जाऊन बसायचं होतं. सीनचा मूड पाहून अक्षयने सांगितलं, की मी आत येताना थोडा डान्स करेन. पण तो काय करणार हे कोणालाच माहीत नव्हतं. सीन सुरू झाल्यावर अक्षय आला आणि त्याने आपल्या पद्धतीने डान्स करत हे शूट पूर्ण केलं’. त्याने स्वतः केलेला हाच डान्स रातोरात व्हायरल झाला आहे.



