Akshay Shinde Encounter:बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर,पहा!नेमकं काय घडलं?

0
Akshay Shinde Encounter:बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर,पहा!नेमकं काय घडलं?
Akshay Shinde Encounter:बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर,पहा!नेमकं काय घडलं?

akshay shinde encounter : बदलापूरमधील (Badalapur) एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले होते. आता या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा काल सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत मृत्यू झालाय. या खळबळजनक घटनेनं आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून हा एन्काऊंटर (Encounter) करण्यात आला का? असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांनी केला. तर अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो ठार झाला,असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे.

नक्की वाचा : भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले – संग्राम जगताप

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर झाला कसा? (Akshay Shinde Encounter)

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते. त्यावेळी अक्षय शिंदेने एका पोलिसाची बंदूक हिसकावून घेत त्यांच्यावर गोळीबार केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली. अक्षय पळून जाऊ नये म्हणून स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात अक्षयला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल.अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षकांचे नाव संजय शिंदे असं आहे. शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

अक्षय शिंदेंचे आई-वडील काय म्हणाले? (Akshay Shinde Encounter)

या प्रकरणी अक्षय शिंदेंच्या आई वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.“आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. आमच्या मुलाने साधे फटाके फोडले नाही. तो बंदूक खेचून गोळीबार कसा करू शकतो ? शाळा प्रशासनाच्या दबावातून हे करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

अक्षयच्या एन्काऊंटर नंतर विरोधकांकडून सरकारवर आणि खासकरुन गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र पोलिसांवर हल्ला केल्याने पोलिसांनी उत्तरादाखल गोळीबार केला त्यात ही घटना घडली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं, याबाबत योग्य ती चौकशी केली जाईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितले. आता या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर हे प्रकरण काय वळण घेणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here