काेड रेड
Alert : नगर : भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विशेष बाब अशी की, हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्राच्या (Maharashtra) दिशेने आगे कूच करत आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील दाेन दिवस पावसाचा यलाे अलर्ट (Alert) जारी केला आहे.
हे देखील वाचा : ५४ चौरस फुटांचे चित्र साकारून मनोज जरांगेचे स्वागत
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगामही वाया गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा होती. २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसामुळे रब्बीच्या आशा पल्लवीत होणार आहेत.
नक्की वाचा : ‘शांतीकुमारजी फिरोदिया’ फाउंडेशन बुद्धिबळाच्या प्रचार, प्रसारासाठी कटिबद्ध : नरेंद्र फिरोदिया
नगरसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, बीड, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.