Alert : नदीकाठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा

Alert : नदीकाठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा

0
Alert : नदीकाठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा
Alert : नदीकाठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा

 काेड रेड…

Alert : नगर : पुणे (Pune) जिल्ह्यात पावसानं (Rain) थैमान घातलंय. भीमा नदीची धोका पातळी जवळ येऊन पोहोचली आहे. तसेच गाेदावरी नदी पात्रात माेठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा (Alert) दिला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकाेर पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.  

नक्की वाचा: खासदार लंकेंनी मांडला एलसीबीच्या भ्रष्टाचाराचा अर्थसंकल्प

भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली असून खडकवासला व इतर धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीस दौंड पूल येथे मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पुणे व नगर जिल्ह्यात पाऊस सुरु असून दौंड पूल येथे भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत बंडगार्डन, पुणे येथे एक लाख पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आज रात्री दौंड पूल येथे भीमा नदीचा विसर्गामध्ये वाढ होऊन विसर्ग एक ते दीड लाख क्युसेक होण्याची शक्यता आहे. तरी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे व कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे.

अवश्य वाचा: पुण्यात मुसळधार पाऊस;अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

गोदावरी नदीतील विसर्गामध्ये होऊ शकते वाढ (Alert)

नाशिक व नगर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. तरी नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासे या तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यात येते की, नगर जिल्ह्यात आजपावेतो ३१५.१० मिलीमीटर सरासरी पर्जन्याच्या ७०.३२ टक्के पाऊस झालेला आहे.

अशी घ्या खबरदारी
नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत १०७७ या टोल फ्री वर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here