Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’

Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस 'यलो अलर्ट'

0
Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस 'यलो अलर्ट'
Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस 'यलो अलर्ट'

Alert : नगर : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) अहिल्यानगर जिल्ह्यात २३ व २४ सप्टेंबर असे सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा (Alert) इशारा देत या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने (District Administration) नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नक्की वाचा : सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही; निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका

मुसळधार पावसाची शक्यता

अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. तसेच पावसामुळे नद्यांच्या विसर्गात वाढ होत आहे. त्यामुळे पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अवश्य वाचा: नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अनेक नद्यांमधून विसर्ग सुरु (Alert)

सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १० हजार १९८ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३ हजार १५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून ७०० क्युसेक, ओझर बंधारा ४ हजार २९९ क्युसेक, मुळा धरणातून पाच हजार क्युसेक, घोड धरणातून तीन हजार क्युसेक, सीना धरणातून ११ हजार ५६० क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ३०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १ हजार ६०० क्युसेक, खैरी धरण येथून ९ हजार ६१३ इतका विसर्ग सुरू आहे.