Ali Mothi Shahani Movie:‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला गोव्यात सुरवात 

0
Ali Mothi Shahani Movie:‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा!
Ali Mothi Shahani Movie:‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा!

नगर : काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या ‘आली मोठी शहाणी’ (Ali Mothi Shahani Movie) या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.आता या चित्रपटाच्या गोव्यातील चित्रीकरणाचा (Start Shooting) श्रीगणेशा झाला आहे. या निमित्ताने प्रेक्षकांसमोर एक नवी आणि हटके जोडी झळकणार आहे ती म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि सारंग साठ्येची. या दोघांची फ्रेश ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेमकी कशी असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

नक्की वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन   
हृता तिच्या गोड आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखली जाते, तर सारंगने नेहमीच वेगळ्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांवर ठसा उमटवला आहे. त्यामुळे ‘आली मोठी शहाणी’त दोघांची जोडी नेमकी कोणत्या कथानकातून झळकणार, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अवश्य वाचा: “राज्याचा ज्येष्ठ मंत्री जातीयवादावर वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही”-शरद पवार 

दिग्दर्शक आनंद गोखले काय म्हणाले ? (Ali Mothi Shahani Movie)

दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले, “नुकतीच चित्रीकरणाला सुरुवात झाली असून प्रेक्षकांसाठी एक वेगळं आणि मनोरंजक कथानक घेऊन आम्ही येत आहोत. हृता आणि सारंगची जोडी नक्कीच सर्वांना आवडेल, याची मला खात्री आहे. संपूर्ण टीम या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे.”

हृता-सारंगची जोडी काय करणार कमाल ? (Ali Mothi Shahani Movie)

चित्रपटाचं शीर्षक ‘आली मोठी शहाणी’ जितकं आकर्षक, तितकंच ते कथानकाबद्दल कुतूहल निर्माण करणारं आहे. आता या हटके शीर्षकाखाली नेमकं काय घडणार आणि हृता-सारंगची जोडी प्रेक्षकांच्या मनात किती शहाणी ठरणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केलं आहे. ‘फाईन ब्रू प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि ‘ट्रू होप फिल्म वर्क्स’च्या सहयोगाने प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते जयकुमार मुनोत, ईशा मूठे आणि श्रुती साठे आहेत.