All India Badminton : यश शाहची तिसऱ्यांदा खेलो इंडिया व ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

All India Badminton : यश शाहची तिसऱ्यांदा खेलो इंडिया व ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

0
All India Badminton : यश शाहची तिसऱ्यांदा खेलो इंडिया व ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
All India Badminton : यश शाहची तिसऱ्यांदा खेलो इंडिया व ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

All India Badminton : नगर : अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) यश अनिल शाह या उदयोन्मुख खेळाडूची तिसऱ्यांदा खेलो इंडिया (Khelo India)ऑल इंडिया बॅडमिंटन (All India Badminton) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत कांस्य पदक मिळवून दिले.

नक्की वाचा : ‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’,कालीचरण महाराजांची जरांगेंवर खोचक टीका

स्पर्धेतील मानाचा करंडक व कांस्य पदक मिळवले

भोपाळ येथील सेझ युनिव्हसिटी येथे  १२ ते१६ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने इंदौरच्या अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचा ३-० असा पराभव केला. तसेच स्पर्धेतील मानाचा करंडक व कांस्य पदक मिळवले. या स्पर्धेमध्ये १०७ विद्यापीठातील निवडक ७०० खेळाडूंचा समावेश होता. संभाजीनगरच्या या संघामध्ये अहिल्यानगर येथील यश शाहचा समावेश होता. 

अवश्य वाचा : ‘वाकडी टिकली लावलेले स्वतःला धर्माचे रक्षक मानतात’- मनोज जरांगे

खेलो इंडिया स्पर्धेसाठी तिसऱ्यांदा निवड (All India Badminton)

यश या विद्यापीठातून डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. संघातील खेळाडूंमध्ये समवेत यश शाह व प्रथमेश कुलकर्णी या खेळाडूंनी या विद्यापीठाच्या विजयात एकेरी व दुहेरी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. संघामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे खेळाडू नागेश चांगले, श्रावण दुधाडे, तुषार शाह, निनाद कुलकर्णी व सदानंद महाजन या खेळाडूंचा समावेश होता. या संघाला प्रशिक्षक चेतन तायडे व संघ व्यवस्थापक हिमांशू गोडबोले यांचे मार्गदर्शन मिळाले. यश हा पुणे येथील सी.एन.बी.ए. या चैतन्य नाईक संचलित ॲकॅडमीमध्ये बॅडमिंटनचे धडे गिरवत आहे. त्याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मिहीर तेहरणीकर यांचे फिटनेससाठी मार्गदर्शन मिळत आहे. यशची खेलो इंडिया स्पर्धेसाठी तिसऱ्यांदा निवड झाली आहे. त्याने या अगोदर त्याची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली होती. मालदीव, व्हिएतनाम, नागपूर येथील स्पर्धेत सहभागी होऊन भारत देशाचे प्रतिनिधीत्व केले होते.