All India Kisan Sabha : अकोले : शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, पीकविमा (Crop Insurance), शेतीकामांचा रोजगार हमीत समाविष्ट करा, मुक्त व्यापार करार रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने (All India Kisan Sabha) अकोले तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने (Protests) केली.
नक्की वाचा: अहिल्यानगर महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर; २०१८च्या प्रभाग रचनेत अंशतः बदल
विविध मागण्यांकडे वेधले लक्ष
टेरीफच्या धोरणामुळे मोठे नुकसान होणार आहे. तसेच दूध, सोयाबीन, गहू, मका व इतर अनेक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार आहे. अशाप्रकारचे घातक निर्णय सरकारने मागे घ्यावे, घराच्या तळजमिनीचा सर्वे पूर्ण केलेल्या निवासधारकांना पंचनाम्याचे पुरावे द्या, उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करा, आदिवासी भागात अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे काविळने रुग्ण वाढत आहेत त्यांना तातडीने शुद्ध पाणीपुरवठा द्या, पुढील वर्षी हिरडा झाड लागवडीच्या रोपांची आतापासूनच रोपे तयार करण्याची व्यवस्था करा, पुरुषवाडी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा द्या, ६५ वर्गावरील महिलांना लाडक्या बहिणींचे मानधन चालू करा, जाचक अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींचे मानधन बंद करू नका, हिरड्याला हमीभाव द्या व हिरडा झाडाची सातबारा उताऱ्यावर नोंद करा, भंडारदरा धरण अंतर्गत बुडीत बंधारे बांधा, प्रलंबित वनदावे मंजूर करा, ग्रामीण भागात सततच्या पावसामुळे वाऱ्यामुळे वीजपुरवठा सतत खंडित होतो परिणामी लोकांना कायम अंधारात राहावे लागले, बोगस पद्धतीने वीजबिले ग्राहकांना दिले गेले आहे, अशी वाढीव बोगस वीजबिले रद्द करुन रीतसर वीजबिले देण्यात यावी, राजूर आंदोलनात जीर्ण झालेले विद्युत पोल बदलण्याचे ठरले होते, त्याची अंमलबजावणी तातडीने करा, राजूर शहरातील बँकांमध्ये पुस्तके छापून मिळावी, महाराष्ट्र बँकेतील प्रिंटर तत्काळ चालू करावे, ग्रामीण भागातील बँकांमध्ये मनुष्यबळ वाढवावे, कोतूळ मुक्कामी नगर एसटी बस चालू करा, अकोले वाघापूर ही बस बोरी-कोतूळपर्यंत चालू करा, अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
अवश्य वाचा : मोहटा येथील शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन (Kisan Sabha)
याबाबत नायब तहसीलदार किसन लोहरे यांना निवेदन देण्यात आले. यावर सदाशिव साबळे, नामदेव भागरे, एकनाथ मेंगाळ, प्रकाश साबळे, शिवराम लहामटे, ताराचंद विधे, नामदेव पिंपळे, आराधना बोऱ्हाडे, संगीता साळवे, कुसा मधे, जुबेदा मणियार आदींच्या सह्या आहेत.