All India Kisan Sabha : ‘लाल वादळ’ संगमनेरात धडकले; प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचा लोणीच्या दिशेने एल्गार!

All India Kisan Sabha : 'लाल वादळ' संगमनेरात धडकले; प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचा लोणीच्या दिशेने एल्गार!

0

All India Kisan Sabha : संगमनेर : आपल्या न्याय्य हक्कांच्या पूर्ततेसाठी अकोले तालुक्यातील राजूर येथून निघालेला अखिल भारतीय किसान सभा (All India Kisan Sabha) आणि ‘सीटू’ (CITU) प्रणित कामगारांचा लाँग मार्च (Long March) आज बुधवारी (ता.२५) रात्री ८ वाजेच्या सुमारास संगमनेर शहरात दाखल झाला. हजारो कष्टकऱ्यांच्या सहभागाने संगमनेरचे प्रांत कार्यालय ‘लाल वादळा’ने वेढले आहे. आजचा मुक्काम येथेच असणार आहे. उद्या (ता. २६) गुरुवारी सकाळी हा मोर्चा राज्याचे लक्ष लागून असलेल्या लोणीच्या दिशेने प्रस्थान करेल. आणि तिथेही मागण्या मान्य न झाल्यास अहिल्यानगरच्या दिशेने कूच करणार आहे.

नक्की वाचा : सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गाबाबत अधिवेशनात मांडला प्रश्न

All India Kisan Sabha : 'लाल वादळ' संगमनेरात धडकले; प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचा लोणीच्या दिशेने एल्गार!
All India Kisan Sabha : ‘लाल वादळ’ संगमनेरात धडकले; प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचा लोणीच्या दिशेने एल्गार!

सरकारने दिलेली आश्वासने अद्याप कागदावरच

नाशिक, ठाणे आणि पालघर येथील मागील आंदोलनांमध्ये सरकारने दिलेली आश्वासने अद्याप कागदावरच असल्याने कष्टकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. यावेळच्या १४८ किलोमीटरच्या लाँग मार्चमध्ये प्रामुख्याने खालील मागण्या मांडण्यात आल्या आहेत. वन जमिनी आणि गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या दाव्यांची पुन्हा पडताळणी करून घराखालील जागा नावे करणे. तसेच वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करणे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे पूर्वीच्या सर्वेप्रमाणेच देवठाण आणि बोटा स्टेशनसह मार्गी लावणे. अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मानधनात वाढ करणे. भंडारदरा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी हक्काचे पाणी उपलब्ध करून देणे. निराधार योजनेतील लाभार्थ्यांना किमान ५ हजार रुपये मानधन देणे आणि बांधकाम कामगारांना सर्व आजारांसाठी वैद्यकीय योजना लागू करणे.

अवश्य वाचा : बायकोला न विचारता दारु प्याल तर जेलमध्ये जाल…

All India Kisan Sabha : 'लाल वादळ' संगमनेरात धडकले; प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचा लोणीच्या दिशेने एल्गार!
All India Kisan Sabha : ‘लाल वादळ’ संगमनेरात धडकले; प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचा लोणीच्या दिशेने एल्गार!

महिलांची संख्या लक्षणीय (All India Kisan Sabha)

या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मंत्रालयात बैठकीचे संकेत मिळाले आहेत. प्रत्येक विभागाचे मंत्री संबंधित मागण्यांवर २० मिनिटे चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र, “जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत चर्चा आणि आंदोलन एकाच वेळी सुरू राहील,” अशी आक्रमक भूमिका किसान सभेने घेतली आहे. राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक देऊन या मोर्चाची सुरुवात झाली होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ताराचंद विघे आणि सचिन ताजने यांसह अनेक पदाधिकारी मोर्चाचे नेतृत्व करत आहेत.

हे देखील वाचा : अहिल्यानगर महानगरपालिकेकडून १४ मार्चपर्यंत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सवलत

पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. हा लाँग मार्च उद्या लोणीमार्गे पुढे सरकत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. सरकार यावर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.