
All India Open Chess Tournament : नगर : अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) प्रायोजित व अ.नगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा (All India Open Chess Tournament) आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ५ नोव्हेंबर पासून ते रविवार ९ नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी दिली. या स्पर्धेत भारतातून खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार असून आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू इत्यादी राज्यातून दोनशेच्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
अवश्य वाचा: सफाई काम करणाऱ्या महिलेची मुलगी झाली क्लास वन अधिकारी
अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार
इंटरनॅनल मास्टर आदित्य डिंगरा (हरियाणा), राहुल संगमा (गुजरात), अनुप देशमुख (महाराष्ट्र) सह अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. साडेपाच वर्षाचा सर्वात बाल खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार आहे, असे अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, व सचिव यशवंत बापट यांनी सांगितले. बुधवारी सकाळी ११.३० वाजता ही स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत. शेवटी रविवारी दुपारी दोन वाजता अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.
नक्की वाचा : “पंकजा मुंडेंना गृहमंत्री तर सुषमा अंधारेंकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या”
जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी हाेण्याचे आवाहन (All India Open Chess Tournament)
या स्पर्धेत पंच विनिता श्रोत्री (पुणे), श्रद्धा विंचवेकर(पुणे), शार्दुल तापसे (सांगली), पवन राठी (पुणे) इ स्पर्धेच्या आयोजनामध्ये सहकार्य करणारा असून त्यांना ८ सहाय्यक पंच सुद्धा मदत करणार आहेत. अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, शाम कांबळे, देवेंद्र ढोकळे, सनी गुगळे, प्रशांत गंगेकर, रोहित आडकर, मनीष जस्वनी, चेतन कड, प्रकाश गुजराती, विशाल गुजराथी, नवनीत कोठारी, स्वप्नील भागुरकर, दत्ता गाडगे, सुनील जोशी आदी स्पर्धा यशस्वी होण्या साठी प्रयत्नशील आहेत. अहिल्यानगर शहरातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व पालकांनी, बुद्धिबळ खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी यशवंत बापट व पारूनाथ ढोकळे यांच्याकडे नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.


