Amar Jawan : श्रीगोंदा : भारत माता की जय… वंदे मातरम्… लक्ष्मण डोईफोडे अमर रहे… वीर जवान (Amar Jawan) अमर रहे…च्या घोषणा देत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील शहीद (Shaheed) जवान सुभेदार सुभाष श्रीरंग लगड यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.
हे देखील वाचा: ज्यांनी दादांची साथ सोडली, ते जनतेची साथ काय देणार; राधाकृष्ण विखेंची लंकेंवर टीका
मुलांच्या शाळेच्या कामासाठी आले होते सुट्टीवर (Amar Jawan)
सुभेदार सुभाष श्रीरंग लगड हे १९९७ साली भारतीय सेनेत भरती झाले होते. त्यांनी पुढे शिक्षण घेत पदोन्नती मिळवून ते सुभेदार पदापर्यंत गेले होते. सध्या त्यांची ११६ इन्फंट्री पैरा बटालियन मध्ये दिल्ली येथे पोस्टिंग होती. मुलांच्या शाळेच्या कामासाठी मार्च महिन्यात सुट्टीवर आलेल्या सुभेदार मेजर सुभाष लगड यांना शनिवारी (ता.३०) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी त्यांना पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचे बुधवारी संध्याकाळी उपचारादरम्यान निधन झाले.
नक्की वाचा: फुटबाॅल खेळ रुजवण्यासाठी गाॅडविन डिक यांचे माेलाचे याेगदान ः नरेंद्र फिराेदिया
वीर जवान अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमला (Amar Jawan)
गुरुवारी (ता.४) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुभेदार सुभाष लगड यांचे पार्थिव आर्मीच्या गाडीमधून कोळगाव येथे आणण्यात आले. यावेळी नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, सुभाष लगड अमर रहे, वीर जवान अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. कोळगाव बस स्थानकापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या टेम्पोमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी अंत्ययात्रेसाठी गर्दी केली होती. यानंतर कन्हेरमळा येथील घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आर्मीच्या जवानांनी हवेत फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, एन डी रेजिमेंट अहमदनगरचे नायक सुभेदार अर्जुन सिंग, ११६ इन्फंट्री बटालियन टी.ए पैराचे नायब सुभेदार श्रीकृष्ण निसाळ, नायब सुभेदार गांगवे संभाजी तुकाराम तसेच १७ ऑदर रॅन्क, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते.