Amar Jawan : सैन्य दलातील नायक सानप यांना अखेरचा निरोप

Amar Jawan : सैन्य दलातील नायक सानप यांना अखेरचा निरोप

0
Amar Jawan
Amar Jawan : सैन्य दलातील नायक सानप यांना अखेरचा निरोप

Amar Jawan : पाथर्डी : सैन्य दलातील नायक या पदावर कार्यरत असणारे ज्ञानेश्र्वर कचरू सानप (वय ३२) यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Amar Jawan) करण्यात आले. सानप यांच्या शिरसाटवाडी गावी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप (Funeral) देण्यात आला. पाथर्डी शहरातून सैन्य दलाच्या (Military force) वाहनामधून दुपारी मिरवणूक काढण्यात आली.

Amar Jawan
Amar Jawan : सैन्य दलातील नायक सानप यांना अखेरचा निरोप

हे देखील वाचा: शांतीगिरी महाराजांचा नाशिकमध्ये हटके प्रचार

बंदुकीतून हवेत फैरी झाडून अखेरचा निरोप (Amar Jawan)

अमर रहे..अमर रहे..ज्ञानेश्वर सानप अमर रहे.. भारत माता की जय.. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांना देत, देश सेवा करणाऱ्या आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तालुक्याच्या वतीने तहसीलदार उध्दव नाईक, पोलीस दलाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिंमकर, निवृत्ती आगरकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अँड. प्रताप ढाकणे, वंचितचे नेते दिलीप खेडकर, अविनाश पालवे, सेवानिवृत्ती सैनिक संघटनेकडून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कुटुंबाच्या वतीने ज्ञानेश्वर सानप यांना अग्नीडाग दिल्यानंतर बंदुकीतून हवेत फैरी झाडून अखेरचा निरोप सैन्य दलाकडून सानप यांना देण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर सानप यांच्याबरोबर असणाऱ्या सैन्य दलातील त्यांच्या सहकाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.

Amar Jawan
Amar Jawan : सैन्य दलातील नायक सानप यांना अखेरचा निरोप

नक्की वाचा: नाशिकमध्ये चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून झाडाझडती

रायफल ५६ बटालियन मध्ये होते कार्यरत (Amar Jawan)

जम्मू काश्मीर येथील कुपवाडा बर्फाळ प्रदेशात ज्ञानेश्वर सानप हे आपले कर्तव्य बजावत असताना डोक्याला काही महिन्यांपूर्वी मार लागला. त्यानंतर गेले तीन महिन्यापासून त्रास वाढल्याने गुरुवारी सानप यांचे निधन झाले. सानप हे राष्ट्रीय रायफल ५६ बटालियनच्या १५ मराठा एल आय गटात ते कार्यरत होते. गेली दहा ते बारा वर्षे त्यांनी सैन्य दलात अतिशय उत्कृष्ट अशी त्यांनी सेवा दिली. बेस्ट फायरर म्हणून त्यांचा नावलौकिक झाला होता. ज्ञानेश्वर सानप हे अतिरेकी कारव्यात सहभागी होऊन त्यांनी चकमकी दरम्यान अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. क्रॉस कंट्री प्लेअर म्हणून त्यांची चांगली ओळख होती. ज्ञानेश्वर सानप हे सध्या सिक्कीम या ठिकाणी सेवेत होते. त्यांच्यावर पुणे येथे सैन्य दलाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ज्ञानेश्वर सानप यांच्या कुटुंबातील आई, वडील, पत्नी, बहीण यांच्यासह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Amar Jawan
Amar Jawan : सैन्य दलातील नायक सानप यांना अखेरचा निरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here