Amar Singh Chamkila :’अमर सिंग चमकीला’चा ट्रेलर प्रदर्शित; दिलजीत-परिणीतीने जिंकलं मन

'अमर सिंग चमकीला' हा चित्रपट १२ एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट प्रसिद्ध संगीतकार अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे.

0
Amar Singh Chamkila
Amar Singh Chamkila

नगर : बॉलिवूडमध्ये ‘अमर सिंग चमकीला’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या त्यांच्या या चित्रपटामुळे मुळे चर्चेत आहे. इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट अमर सिंग ‘चमकिला’ यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

नक्की वाचा : अभिनेत्री मेघा घाडगे झळकणार ‘अप्सरा’ चित्रपटात

‘अमर सिंग चमकीला’ १२ एप्रिल रोजी रिलीज होणार (Amar Singh Chamkila)

‘अमर सिंग चमकीला’ हा चित्रपट १२ एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अमर सिंह चमकिला यांची भूमिका पंजाबी गायक दिलजीत दोसांझ ने साकारली आहे. संगीताच्या दुनियेत नाव कमवण्यासाठी त्यांना जगाशी कसा संघर्ष करावा लागला हे ‘अमर सिंग चमकीला’च्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा देखील मुख्य भूमिकेत असून ती गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

अवश्य वाचा : पाय घसरून पडल्याने दिलीप वळसे पाटील जखमी

ट्रेलरमध्ये नेमके काय ? (Amar Singh Chamkila)

२ मिनिट ३७ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अमर सिंह चमकीला यांनी ‘झिरो’ या चित्रपटातून पदार्पण केल्याचे दाखवण्यात आले आहे. ज्यावेळी चमकीला यांना कोणीही ओळखत नव्हते तेव्हा त्यांची नाव कमवण्याची तळमळ त्यांच्या डोळ्यांत सतत दिसत होती. जेव्हा त्यांनी गाणं गायला सुरू केले, तेव्हा त्यांच्यावर घाणेरड्या गाण्यांचे आरोप झाले. परंतु अशा गोष्टी त्यांना पुढे जाण्यापासून रोखू शकल्या नाहीत. एकीकडे त्यांची लोकप्रियता वाढत असतानाच दुसरीकडे त्यांचे शत्रूही वाढत होते. या चित्रपटात त्याचा संघर्ष दाखवला जात असतानाच त्याच्या मृत्यूची एक वेदनादायी कहाणीही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here