Ambadas Danve:संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंबादास दानवेंनी केली ‘ही’ मागणी 

0
Ambadas Danve:संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंबादास दानवेंनी केली 'ही' मागणी 
Ambadas Danve:संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंबादास दानवेंनी केली 'ही' मागणी 

ambadas danve : राज्यात संतोष देशमुख हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेकदा पोलिसांना कराड आदेश द्यायचे,असा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्हा सोडून पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये चालवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी फडणवीस सरकारकडे केली आहे.

नक्की वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल 

अंबादास दानवे यांचा वाल्मिक कराड प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल (Ambadas Danve)

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप केला जात आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र २२ दिवसांनंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

अवश्य वाचा : फसक्लास दाभाडे’मधील ‘दिस सरले’ गाणं प्रदर्शित;सिद्धार्थ आणि मिताली मयेकर पहिल्यांदा एकत्र 

काय म्हणाले दानवे ? (Ambadas Danve)

अंबादास दानवे म्हणाले की, वाल्मिक कराडसाठी वकील देशपांडे यांनी खटला लढायला नकार दिला.सरकारने खातरजमा केली पाहिजे की ते नकार का देत आहे.ते घाबरत आहे का? केज पोलीस स्थानक वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. राज्याची स्वतंत्र टीम असली पाहिजे. बीड जिल्हा सोडून पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये खटला चालवला पाहिजे. ज्या ठिकाणी पोलिसच त्यांच्यासोबत उठतात, बसतात, तिथे काय चौकशी होणार? वाल्मिक कराड बिनधास्त राहत आहे हे त्याच्या बॉडी लँग्वेजने दिसतंय. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेले सर्व यात दोषी झाले पाहिजे. खटले लागले पाहिजे. सीडीआर चेक करून सर्वांवर कारवाई करायला हवी,असे त्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here