Ambadas Danve: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं काल (ता.१) सभागृहात झालेल्या प्रकरणात निलंबन करण्यात आलं आहे.

0
Ambadas Danve:विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित
Ambadas Danve:विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित

नगर : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं काल (ता.१) सभागृहात झालेल्या प्रकरणात निलंबन (Suspension) करण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित  करण्यात आल्याची घोषणा नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याच्या परवानगी दिली असता देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि त्यांनी आक्षेप घेतला. यानंतर विरोधकांना संधी न देता पुढील कामकाज सुरु करण्यात आले.

नक्की वाचा : भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय;पुण्यातील धबधबे पर्यटकांसाठी बंद  

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा (Ambadas Danve)

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला. अंबादास दानवेंनी आपल्याकडे हात करणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. चंद्रकांत पाटील म्हणाले,अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अर्वाच्य भाषा वापरली आहे. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत पाच दिवसांसाठी त्यांचे निलंबन करण्यात यावे.  

अवश्य वाचा : राज्यात जुलैमध्ये जास्त पावसाच्या सरी;हवामान विभागाचा अंदाज

नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर आवाजी मतदानानं अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निलंबनाच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गटनेत्यांच्या बैठकीला आंबादास दानवे उपस्थित नव्हते. कालच्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली नाही. काल आमच्या समोर हा प्रकार घडला. त्यांच्या पक्षाच्या नेतेमंडळीनी विचार करायला हवं की, संबंधित व्यक्ती महिलांसमोर अशी भाषा वापरत आहे, हे गंभीर आहे. महिलांना काम करणं भविष्यात मुश्किल होईल. म्हणून ही न्याय आणि उचित कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here