AMC : नगर : बालिकाश्रम रस्त्यावरील व बोल्हेगाव येथील महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात आली. महापालिकेच्या (AMC) अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाने ही कारवाई (Action) केली.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंची राजकारणात बिकट अवस्था’- विजय वडेट्टीवार
महापालिकेच्या मालकीचा मोकळ्या भूखंडावर अतिक्रमन
बालिकाश्रम रस्त्यावर महापालिकेच्या मालकीचा मोकळा भूखंड आहे. त्यावर काहींनी पत्र्याचे शेड उभारून दहा ते बारा टपऱ्या टाकल्या होत्या. या सर्व टपऱ्या, शेड गेल्या तीन दिवसांपासून कारवाई करून हटवण्यात आले. सुमारे अडीच एकर क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. त्याभोवती पत्र्याची संरक्षक भिंत करण्यात येणार आहे. तसेच, बोल्हेगाव येथेही महापालिकेच्या एका मोकळ्या भूखंडावर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत वेळोवेळी तक्रारी झाल्या होत्या. हे अतिक्रमणही महापालिकेच्या पथकाने कारवाई करून हटवले आहे.
अवश्य वाचा : ‘सखा’ने पटकाविला ‘अहिल्यानगर महाकरंडक
बालिकाश्रम रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे (AMC)
सध्या पत्रकार चौक ते दिल्लीगेट वेस रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बालिकाश्रम रस्त्यावर रहदारी वाढली आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. पत्र्याचे शेड, दुकानांचे जाहिरात फलक, फुटपाथवर साहित्य ठेवण्यात येते. या भागाची संपूर्ण पाहणी करण्यात आली आहे. तेथील अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येत आहे. लवकरच सर्व अतिक्रमणे हटवून बालिकाश्रम रस्त्याचा श्वास मोकळा केला जाईल, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.