AMC : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील तारकपूर भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला गळती (Water pipeline leaks) लागली आहे. त्यामुळे तारकपूर परिसरातील तीन गल्ल्यांमधील पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्राला सामोरे जावे लागत आहे. ही माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक योगिराज गाडे (Yogiraj Gade) यांनी तारकपूर परिसराला भेट दिली. तसेच महापालिका (AMC) प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या.
नक्की वाचा : अमेरिकेत आता तृतीयपंथींना मान्यता नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय
नगरसेवक गाडे यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या
महापालिकेने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत, पाणीपट्टी आणि मालमत्ता करात १०० टक्के वाढ केली आहे. मात्र, त्या बदल्यात नागरिकांना किमान मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत. पाणी गळतीमुळे निर्माण झालेल्या या समस्या विरोधात नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या, मात्र महापालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नगरसेवक योगीराज गाडे यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. त्यांनी या प्रकरणावर त्वरित लक्ष देण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आणि नागरिकांची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
अवश्य वाचा : नवा जुना वाद मिटवून पक्षाचे काम करा: डाॅ. सुजय विखे पाटील
नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले, (AMC)
“गेल्या ५-६ दिवसांपासून ही समस्या सुरू आहे. घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेने तातडीने या गळतीचे निराकरण करावे. मी याबाबत महापालिका प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत. नागरिकांची ही समस्या त्वरित सोडवली जावी, अशी अपेक्षा सर्वांमध्ये आहे. जर महापालिकेने यावर जलद कार्यवाही केली नाही, तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल”, असे त्यांनी सांगितले.