AMC : मराठी नाट्य संमेलनासाठी महापालिकेकडून २५ लाखांचे आर्थिक सहकार्य : आयुक्त डांगे

AMC : मराठी नाट्य संमेलनासाठी महापालिकेकडून २५ लाखांचे आर्थिक सहकार्य : आयुक्त डांगे

0
AMC : मराठी नाट्य संमेलनासाठी महापालिकेकडून २५ लाखांचे आर्थिक सहकार्य : आयुक्त डांगे
AMC : मराठी नाट्य संमेलनासाठी महापालिकेकडून २५ लाखांचे आर्थिक सहकार्य : आयुक्त डांगे

AMC : नगर : अखिल भारतीय नाट्य परिषदेने (All India Theatre Council) १०० वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा (All India Marathi Regional Drama Conference) मान अहिल्यानगरला दिला आहे. २६ व २७ जानेवारी रोजी हे विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगरमध्ये माऊली सभागृह व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. नगरकर नाट्य रसिक तसेच रंगकर्मीना मोठी सांस्कृतिक मेजवानी या संमेलनातून मिळणार आहे. या संमेलनातून शहरात सांस्कृतिक वातावरण तयार होत असून, सुमारे दोन कोटीपर्यंत संमेलनाचा खर्च असणार आहे. त्याला हातभार म्हणून महापालिकेने (AMC) या संमेलनास २५ लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य केले आहे. नगरकर रसिकांनी मोठ्या संख्येने संमेलनातील विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले आहे.

अवश्य वाचा : नवा जुना वाद मिटवून पक्षाचे काम करा: डाॅ. सुजय विखे पाटील

लोककला महोत्सव, एकपात्री, प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांचे प्रयोग

अहिल्यानगर शहरात महापालिकेमार्फत सोयी सुविधा पुरवल्या जातात. मात्र, शहरात विविध क्षेत्रात होणाऱ्या सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे, ही महापालिकेचीही जबाबदारी आहे. आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच शहरवासीयांसाठी होत असलेल्या नाट्य संमेलनास महापालिकेकडून सहकार्य करण्यात आल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले. संमेलनात दोन दिवस बालनाट्य महोत्सव, लोककला महोत्सव, एकपात्री, संगीत नाट्य प्रवेश, प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांचे प्रयोग, एकांकिका, चर्चासत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण शिबिरे, असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. माऊली सभागृहात नाटकांचे प्रयोग होणार आहेत. बुधवार (ता. २२) जानेवारी रोजी रात्री ८ वाजता तुझी औकात काय आहे? या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. (ता. २३) रोजी रात्री ८ वाजता साती साती पन्नास, (ता. २५) रोजी रात्री ८ वाजता मर्डरवाले कुलकर्णी व समारोपाच्या दिवशी (ता. २७) रोजी रात्री ८ वाजता मोरूची मावशी हे नाटक सादर होणार आहे.

नक्की वाचा : अमेरिकेत आता तृतीयपंथींना मान्यता नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

भव्य बालमहोत्सवाचे आयोजन (AMC)

शुक्रवारी (ता. २४) रोजी भव्य बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी १० ते ११ यावेळेत अजय लाटे लिखित आणि शैलेश देशमुख दिग्दर्शित एकांकिका जिना इसिका का नाम है! सादर होईल. सकाळी ११ ते १२ यावेळेत गौरी जोशी लिखित आणि डॉ. विजयकुमार दिग्दर्शित एकांकिका हीच खरी सुरुवात, दुपारी १२ ते १ यावेळेत भारत शिरसाठ आणि चेतन सैंदाणे लिखित व आत्मदर्शन बागडे दिग्दर्शित एकांकिका -डस्टर सादर करण्यात येईल. दुपारी १ ते २ यावेळेत उदघाटन समारंभ होणार असून दुपारी २ ते ३.३० यावेळेत रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन निर्मित कृष्णलीला ही नृत्य नाटिका सादर होणार आहे. प्रजासत्ताक दिनी (ता. २६) जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे यजमानपद अहिल्यानगर ला मिळाले असून, सर्व कलाप्रेमी नगरकरांसाठी संमेलन संस्मरणीय ठरणार आहे. या संमेलनामुळे नगरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडेल, असा विश्वास आयुक्त डांगे यांनी व्यक्त केला.