AMC : शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची महापालिकेकडून होणार तपासणी

AMC : शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची महापालिकेकडून होणार तपासणी

0
AMC : शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची महापालिकेकडून होणार तपासणी
AMC : शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची महापालिकेकडून होणार तपासणी

AMC : नगर : महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयाची तपासणी करुन दैनंदिनी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाच्या (State Government) आरोग्य विभागाने दिले आहेत. महिनाभरात ही तपासणी पूर्ण करून त्याचा दैनंदिन अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयास सादर करावा, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी महापालिकेच्या (AMC) आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार सातही आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

नक्की वाचा : लालपरीचा प्रवास महागला!आजपासून १५% भाडेवाढ

दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागांत लावण्यात यावे

रुग्णालयामध्ये आकारण्यात येणा-या फी व इतर रुग्णालयीन सेवा शुल्क, दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागांत लावण्यात यावे. तसेच रुग्णालयाच्या दर्शनी भागांत स्वच्छ अक्षरात लावण्यात यावी, असे निर्देश आहेत. याबाबत तसेच, रुग्णालयातील मंजूर खाटा व प्रत्यक्षात असलेल्या खाटा संख्या, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र व फायर ऑडिट, जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट, नर्सिंग ॲक्टची अंमलबजावणी आदींची महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा : महाकुंभात व्हायरल झालेल्या मोनालिसाचे नगरशी आहे खास कनेक्शन,जाणून घ्या…

एका महिन्यात पूर्ण अहवाल सादर करण्याच्या सूचना (AMC)

ही कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करून तसा अहवाल कार्यालयाकडे सादर करावा, अशा सूचना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी तपासणीसाठी नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.