AMC : जप्तीची कारवाई महापालिका अधिक तीव्र करणार : आयुक्त डांगे

AMC : जप्तीची कारवाई महापालिका अधिक तीव्र करणार : आयुक्त डांगे

0
AMC : जप्तीची कारवाई महापालिका अधिक तीव्र करणार : आयुक्त डांगे
AMC : जप्तीची कारवाई महापालिका अधिक तीव्र करणार : आयुक्त डांगे

AMC : नगर : महापालिकेने (AMC) मालमत्ता कर (Property Tax) व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांना जानेवारी अखेरपर्यंत शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत सुमारे ४ हजार ७०० थकबाकीदारांनी याचा लाभ घेतला आहे. त्या माध्यमातून ४.६० कोटींची वसुली (Recovery) झालेली आहे.

नक्की वाचा : महाकुंभला जाण्यासाठी विमान तिकिटे स्वस्त होणार;उड्डाण मंत्रालयाचा निर्णय

शास्तीमध्ये १०० % सवलतचे अखेरचे तीन दिवस शिल्लक

थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद असल्याने महापालिकेने जप्ती कारवाई सुरू केली आहे. शास्तीमध्ये १०० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ थकीत कराचा भरणा करावा व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांनी केले आहे.

अवश्य वाचा : सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

अद्यापही २०६ कोटींची थकबाकी (AMC)

महापालिका प्रशासनाने (ता. ८) जानेवारी पासून ३१ जानेवारी पर्यंत मालमत्ता करा वरील शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत दिलेली आहे. अद्यापही २०६ कोटींची थकबाकी आहे. सुमारे ७५ हजार थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. शास्तीमध्ये १०० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने महापालिकेने जप्ती कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.