AMC : नगर : महापालिका प्रशासनाने (AMC) गेल्या काही महिन्यांपासून शहरात व उपनगरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम (Encroachment Removal Campaign) राबवली आहे. अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने एक महिन्याच्या कारवाईचे नियोजन केले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाला नियोजनानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिली आहे.
अवश्य वाचा : भरदिवसा ट्रक चालकाचा गळा कापला; दोघे आरोपी जेरबंद
अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय
शहरात अतिक्रमणांमुळे रस्त्यावर रहदारीला अडथळा होत आहे. वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे पुन्हा केली जात असल्याने आता अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एक महिनाभर विविध भागात ही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य, टपऱ्या, हातगाड्या, फलक व इतर कोणतेही साहित्य यापुढे कोणाही अतिक्रमणधारकाला परत केले जाणार नाही. तसेच या कारवाईत कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.
नक्की वाचा : भारताला मोठा धक्का!जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
कारवाईचे वेळापत्रक जाहीर (AMC)
अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाकडून
१३ फेब्रुवारी रोजी – माणिक चौक-भिंगारवाला चौक-एम.जी. रोड, शहाजीरोड, नविपेठ-बैंक रोड-लक्ष्मीबाई कारंजा- गांधी मैदान- चितळेरोड,
१४ फेब्रुवारी – दाळमंडई-आडतेबाजार-तेलीखुंट-चितळेरोड-नेहरु मार्केट-चौपाटी कारंजा-दिल्लीगेट,
१७ फेब्रुवारी – रोजी जुना दाणे डबरा-मंगलगेट परिसर-राज चेंबर-कोठला परिसर-एस.टी.वर्कशॉप-रामवाडी,
१८ फेब्रुवारी – रोजी सर्जेपुरा चौक-रंगभवन-लालटाकी परिसर- सिव्हील हॉस्पीटल,
२० फेब्रुवारी – रोजी दिल्लीगेट-सिध्दीबाग-बालिकाश्रमरोड-सावेडीगांव,
२१ फेब्रुवारी – रोजी टी.व्ही. सेंटर-प्रोफेसर कॉलनी-भिस्तबागरोड-भिस्तबागचौक-पाईपलाईनरोड-श्रीरामचौक-शिलाविहार-गुलमोहरोड पोलीस चौकी-पारिजात चौक-गुलमोहररोड ते भिस्तबाग रोड,
२४ फेब्रुवारी – रोजी पत्रकारचौक-मनमाड रोड-नागापुर-मनपा हद्दी पर्यंत,
२५ फेब्रुवारी – रोजी हॉटेल चैतन्य क्लासिक-काकासाहेब म्हस्के कॉलेज ते गांधीनगर,
२७ फेब्रुवारी – रोजी पाईपलाईनरोड-डी मार्ट-बंधनलॉन-आठरे पाटील पब्लीक स्कुल तपोवनरोड-भिस्तबाग महाल-नानाचौक-ढवणवस्ती ते जुना पिंपळगांवरोड,
२८ फेब्रुवारी – रोजी कोठला स्टॅण्ड-डी.एस.पी चौक-छत्रपती संभाजी महाराज रोड-वसंत टेकडी ते इंद्रायणी हॉटेल पर्यंत,
३ मार्च – रोजी छत्रपती संभाजी महाराज रोड-फॉरेस्ट ऑफिस ते बडी मस्जीद-पाण्याची टाकी ते मेराज मस्जीद ते राजनगर, गाडे शाळा- टॉपअप पेट्रोल पंप,
४ मार्च – रोजी कोठला स्टॅण्ड-जीपीओचौक-चांदणी चौक-कोठी चौक-मार्केट यार्ड चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-सक्करचौक-कायनेटीक चौक,
५ मार्च – रोजी सक्कर चौक-मल्हार चौक-रेल्वे स्टेशन परिसर-कायनेटीक चौक,
६ मार्च – रोजी कायनेटीक चौक-केडगांव-अंबिकानगर बस स्टॉप व केडगांव परिसर,
७ मार्च – रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-चाणक्य चौक-बुरुडगावरोड-यश पैलेश हॉटेल-आनंदऋषी हॉस्पीटल-चाणक्य चौक-महात्मा फुले चौक ते कोठी,
१० मार्च – रोजी सक्कर चौक-टिळकरोड-आयुर्वेद कॉलेज-अमरधाम-नेप्तीनाका-कल्याणरोड-रेल्वे उड्डाणपुल या नियोजनानुसार कारवाई करण्यात येणार आहे.