AMC : माळीवाडा परिसरातील शाळेची धोकादायक भिंत महापालिकेने हटवली

AMC : माळीवाडा परिसरातील शाळेची धोकादायक भिंत महापालिकेने हटवली

0
AMC : माळीवाडा परिसरातील शाळेची धोकादायक भिंत महापालिकेने हटवली
AMC : माळीवाडा परिसरातील शाळेची धोकादायक भिंत महापालिकेने हटवली

AMC : नगर : अहिल्यानगर महापालिका (AMC) प्रशासनाने धोकादायक व मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती, वस्तूंची पाहणी सुरू केली आहे. ज्यांच्या इमारती, बांधकामे जुनी आहेत. ३० वर्षांपेक्षा अधिक जुने बांधकाम असेल, अशांनी त्यांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करून घ्यावे. महापालिका लवकरच धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू करणार असल्याचे महापालिका आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी स्पष्ट केले.

नक्की वाचा : पुणे हादरलं!स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार

शहरातील धोकादायक इमारतींची तपासणी सुरू

माळीवाडा परिसरातील एका शाळेची धोकादायक भिंत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आज (बुधवारी) उतरवून घेतली. याची माहिती देताना महापालिका आयुक्त डांगे यांनी शहरातील धोकादायक इमारतींची तपासणी सुरू केल्याचे सांगितले. महापालिका शहरातील मोडकळीस आलेल्या व अर्धवट पडलेल्या इमारतींचा सर्वे करून धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींना नोटिसा बजावते. मात्र, अनेक ठिकाणी घरमालक व भाडेकरू वादात या इमारती रिकाम्या केल्या जात नाहीत. शासनाच्या निर्देशानुसार ३० वर्षांपेक्षा जुने बांधकाम असणाऱ्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे.

अवश्य वाचा : राजकारण हे नेहमी समाजाच्या हिताचे असावे : बाळासाहेब थोरात

जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे (AMC)

पावसाळ्यात एखादी दुर्घटना टाळण्यासाठी जुन्या इमारत मालकांनी आपल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. महापालिकेने तपासणी सुरू केली आहे. माळीवाडा परिसरातील एका शाळेची भिंत धोकादायक अवस्थेत होती. ती पडून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अथवा शाळेतील मुलांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत ही भिंत हटवण्यात आली आहे. शहरातील इतर धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.