AMC : नगर : महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये जानेवारी २०२५ मध्ये राज्यात अहिल्यानगर महापालिकेने (AMC) प्रभावी कामगिरी करत दहावा क्रमांक मिळवला आहे. राज्यातील २७ महापालिकांमध्ये स्थान मिळवताना महापालिकेने विविध आरोग्य उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आगामी काळात, राज्यात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्याचा महापालिकेचा निर्धार आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सर्व स्तरांवर अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार आहे, असे आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी सांगितले.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार,मात्र योजना बंद करणार नाही- अजित पवार
डेंग्यूमुक्त शहराकडे वाटचाल
आयुक्त यशवंत डांगे यांच्या नेतृत्वाखाली १२ आठवड्यांचे डेंग्यूमुक्त अभियान विविध प्रभागात प्रभावीपणे राबविण्यात आले. या मोहिमेमुळे शहरातील डेंग्यू नियंत्रणात येऊन, डेंग्यूमुक्त शहराकडे वाटचाल सुरू झाली आहे. महापालिकेच्या वतीने आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी भविष्यातील विविध आरोग्य योजनांवर भर दिला जाणार आहे.
नक्की वाचा : अखेर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची उद्या घरवापसी
नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी वचनबद्ध (AMC)
मातृ आणि बाल आरोग्य सुधारणा, कुटुंब नियोजन आणि लसीकरण कार्यक्रमांचे व्यापक आयोजन, संक्रामक व असंक्रामक रोग नियंत्रणासाठी विशेष उपक्रम, तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य व्यवस्थापन अधिक प्रभावी पणे राबविले जाणार असून, नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी वचनबद्ध आहे. भविष्यात अधिक चांगल्या कामगिरीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.