AMC | महापालिकेकडून रस्त्यांवर अंधार अन् अधिकाऱ्यांच्या दालनात अर्धा कोटीचा लखलखाट

0
AMC :
AMC :

AMC | नगर : अहिल्यानगर महापालिकेतील (AMC) कॉन्फरन्स रूम व अधिकाऱ्यांची दालनात इलेक्ट्रिक काम करणे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लावण्यासाठी स्थायी समितीने ५१ लाख ३५ हजार ३५० रुपयांची निविदा मंजूर केली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही मंजुरी दिली. अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरात पथदिव्यांची दयनीय स्थिती असताना दिवसा चालणाऱ्या महापालिका कार्यालयात विद्युत कामावर मोठा खर्च केला जात आहे.  

हे वाचा – विद्यार्थी वसतीगृहाच्या उभारणीसाठी प्रस्ताव सादर करा : ललित गांधी

प्रशासक राज (AMC)

अहिल्यानगर महापालिकेत मागील १६ महिन्यांपासून प्रशासक राज आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे महापालिकेतील प्रशासनाची सर्व सूत्रे आहेत. त्यांनी अहिल्यानगर महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये कॉन्फरन्स रुम व अधिकाऱ्यांच्या दालनात इलेक्ट्रिक काम करणे व इलेक्ट्रॉनिक वस्तू बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यानुसार शहरातील सबजेल चौकातील रमा विजाया इलेक्ट्रिकल्स व शहरातीलच जय मुंजोबा लाईट हाऊस यांना ५१ लाख ३५ हजार ३५० रुपयांचे काम देण्याचे स्थायी समितीत निश्चित केले. त्यामुळे आता महापालिकेत अर्धा कोटीचा उजेड पडणार असल्याची चर्चा शहरात आहे.

अवश्य वाचा – डॉ. प्रकाश कांकरिया यांच्यावरील हल्ला प्रकरण; १७ आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कैदेची शिक्षा

रस्त्यांवर अंधार (AMC)

अहिल्यानगर शहरातील गुलमोहर रस्त्यासह अनेक रस्त्यांवर पथदिवे नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. मात्र, महापालिकेकडून दिवसा खुले असणाऱ्या कार्यालयावर लाखो रुपयांचा विद्युत खर्च होत असल्याचे निविदा मंजुरीतून समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here