AMC : नगर महापालिकेचे १ हजार ५६० कोटीचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर

AMC : नगर महापालिकेचे १ हजार ५६० कोटीचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर

0
AMC

AMC : नगर : नगर महापालिकेच्या (AMC) प्रशासकीय महासभेत १ हजार ५६० कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रक (Budget) मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ (Tax Hike) सुचविली नाही. मात्र, महापालिका नगरकरांना मोजून पाणी देणार आहे. त्यासाठी नळांना मीटर तर उपनगरांसाठी स्वतंत्र भूयारी गटार देणार आहे.

हे देखील वाचा: “पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला”; पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा

महासभेकडून मंजुरी (AMC)


प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आज एक हजार ४०० कोटी ९१ लाखांचे मूळ अंदाजपत्रक प्रशासकीय स्थायी समितीला सादर केले. स्थायीने त्यात वाढ सूचवून एक हजार ५६० कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले. महासभेने त्यास मंजुरी दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, डॉ. सचिन बांगर, प्रभारी उपायुक्त सपना वसावा, नगरसचिव मेहेर लहारे, मुख्य लेखाधिकारी डॉ. सचिन धस, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, शहर अभियंता मनोज पारखे, नगर रचनाकार राम चारठणकर, जल अभियंता परिमल निकम, राकेश कोतकर, अनिल लोंढे, सुधाकर भुसारे, शेखर देशपांडे आदी उपस्थित होते.

नक्की वाचा: कोपरगाव शहरात घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू.

उपनगरांसाठी स्वतंत्र भुयारी गटार (AMC)


आयुक्त डॉ. जावळे यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात शहर विकासासाच्या दृष्टीने भरीव तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न ४३० कोटी ८ लाख, तर भांडवली जमा एक हजार ५० कोटी ८ लाख अपेक्षित आहे. तसेच महसुली उत्पन्नात संकलित करापोटी १०३ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. उपनगरांसाठी स्वतंत्र भुयारी गटार योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील चौकांचे लोकसहभागातून सुशोभिकरण, महापालिका शाळांचे डिजीटलायझेशन, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, उद्यानांची दुरूस्ती अशा विविध सेवा- सुविधांवर अंदाजपत्रकात भर देण्यात आला आहे.

असे आहे अंदाजपत्रक

महसुली उत्पन्न – ४३० कोटी ८२ लाख
भांडवली जमा – १०५० कोटी ८ लाख

प्रमुख खर्च (कोटी)

वेतन व भत्ते – १६९
पेन्शन – ४९
पाणीपुरवठा वीजबिल – ३६
पथदिवे वीजबिल – ६
शिक्षकांचे वेतन – ७
कचरा संकलन – २
टँकरने पाणीपुरवठा – ३
वाहन खरेदी – १
नवीन रस्ते – ५०
रस्ते दुरूस्ती – ४
पुतळे बसविणे – २

नगरकरांंवर कोणतीही करवाढ लादण्यात आलेली नाही. अंदाजपत्रक सादर करताना सेवा- सुविधांवर भर देण्यात आलेला आहे. उपनगरांसाठी स्वतंत्र भुयारी गटार योजना, मीटरद्वारे पाणीपुरवठा, चौकांचे सुशोभिकरण, चांगले रस्ते यासारख्या सुविधांसाठी अंदाजपत्रकात तरतूद आहे.

  • डॉ. पंकज जावळे, आयुक्त

नळांना बसणार मीटर

शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यात अनधिकृत नळजोडांची संख्या समोर येणार आहे. नळांना मीटर बसविण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. मंजूरनंतर प्रत्येक नळाला मीटर बसविण्यात येणार आहे. त्यातून मोठी पाणी बचत होणार आहे.

दीडशे कोटीचे कर्ज

पाणीपुरवठ्यासाठी सुमारे ४९५ कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित आहेत. या योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहेत. त्यात महापालिकेला स्वःहिस्सा भरावा लागणार आहे. त्यासाठी दीडशे कोटी रुपये कर्ज घेण्यात येणार आहे. अमृत योजनेंतर्गत उपनगरात भुयारी गटार योजना (फेज २) राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात शंभर कोटींची तरतूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here