AMC : नगर : शहरातील जुने बसस्थानक (Bus Stand), माळीवाडा तसेच आरटीओ (RTO) कार्यालयासमोर महापालिकेच्या (AMC) जागेत करण्यात आलेले पक्के अतिक्रमणावर अतिक्रमण (Encroachment) निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई करून हटवले. तेथील पत्र्याच्या शेड, ऑफीस केबिन जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.
नक्की वाचा : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमाफी;एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
महापालिकांच्या जागांवरील अतिक्रमणांचा आढावा घेतला
पोलीस अधीक्षक कार्यालय चौकालगत असलेल्या महापालिकेच्या पाण्याच्या टाकीशेजारी असलेल्या जागेत अतिक्रमण करून वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय थाटण्यात आला होता. तेथील अतिक्रमण महापालिकेने यापूर्वी कारवाई करून काढले होते. दरम्यानच्या काळात अतिक्रमणधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली व जागेवर दावा करून पुन्हा अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला. सदरची जागा महापालिकेच्या मालकीची असून, नगरपरिषद काळात या ठिकाणी उद्यानही होते. त्यामुळे न्यायालयात झालेल्या सुनावणीत ही जागा महापालिकेची सरकारी जागा असल्याचे स्पष्ट झाले व जागा तत्काळ खाली करण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अभियंता सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून अतिक्रमण हटवले. शहरातील महापालिकांच्या जागांवरील अतिक्रमणांचा आढावा घेतला जात आहे. टप्प्याटप्प्याने या जागांवरील अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी
महापालिका, पोलिसांची संयुक्तपणे कारवाई (AMC)
दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका, कोतवाली पोलीस व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली आहे. कोठला स्टँड, माळीवाडा बसस्थानक परिसरात अतिक्रमणांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.