AMC : मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद; ३० जून पर्यंत मिळणार ८ टक्के सवलत

AMC : मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद; ३० जून पर्यंत मिळणार ८ टक्के सवलत

0
AMC : मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद; ३० जून पर्यंत मिळणार ८ टक्के सवलत
AMC : मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद; ३० जून पर्यंत मिळणार ८ टक्के सवलत

नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन चालू वर्षाचा कर भरावा व दंड टाळावा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

AMC : नगर : नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले (Bill) वाटप करण्यात आले आहे. महानगरपालिका (AMC) अधिनियमानुसार जून महिन्यापर्यंत सर्वसाधारण करावर ८ टक्के सवलत दिली जाते. ३० जून अखेर ही मुदत संपणार आहे. शहरातील ३७१५५ मालमत्ताधारकांनी आत्तापर्यंत सवलतीचा लाभ घेऊन कर भरला आहे. उर्वरित नागरिकांनीही ३० जून अखेर असलेल्या सवलतीचा लाभ घेऊन वेळेत कराचा भरणा (Tax Payment) करावा व दंड टाळावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले आहे.

विक्रमी वसुली

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीला मागील आर्थिक वर्षात नगरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रमी वसुली झाली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १४० अ नुसार करात एप्रिलमध्ये १०%, मे व जूनमध्ये ८% अशी सर्वसाधारण करात सूट दिली जाते. या वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरानुसार बिले वाटप करण्यासाठी काही प्रमाणात विलंब झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात दिली जाणारी १०% सवलत अनेकांना मिळू शकली नाही. नवीन दरानुसार बिलांचे वाटप केल्याने काहींना उशिरा बिले मिळाली. त्यामुळे नागरिकांना सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी मे महिन्यातही १० टक्के सवलत सर्वसाधारण करावर देण्यात आली होती. या काळात ३३९२८ मालमत्ताधारकांनी २२.८५ कोटींचा कर जमा केला.

जून अखेरपर्यंत ८ टक्के सवलत लागू (AMC)

आता जून अखेरपर्यंत ८ टक्के सवलत लागू आहे. आत्तापर्यंत ३१८६ मालमत्ताधारकांनी जून महिन्यात सवलत घेऊन २.२४ कोटींचा कर जमा केला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात ३७१५५ मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेतला. त्यातून सुमारे २५.०९ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. महानगरपालिकेने सेवा व सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. कर वसुलीबाबत सोशल मीडियातून झालेल्या प्रभावी जनजागृतीमुळे सवलत घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्या वर्षी २४०९८ मालमत्ताधारकांनी रोख व चेक स्वरूपात भरणा केला. १०४११ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन पद्धतीने भरणा केला. तर २६०५ मालमत्ताधारकांनी मनपाच्या मोबाईल ॲपद्वारे भरणा केला.

यापूर्वी सवलत काळात सन २०२३-२४ मध्ये २२ कोटी, सन २०२४-२५ मध्ये २४ कोटी रुपये कर जमा झाला होता. यंदा सन २५-२६ मध्ये १८ जूनपर्यंत २५ कोटीपर्यंत भरणा झाला आहे. यावर्षी १०० कोटी कर वसुलीचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. ३० जूनपर्यंत ८ टक्के सवलत मिळणार आहे. मुदत संपल्यानंतर कठोर कारवाई, जप्ती मोहीम सुरू केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना बिले मिळाली नसतील अशा नागरिकांनी त्यांच्या प्रभाग समिती कार्यालयात जाऊन बिल काढून घ्यावे व सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहनही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.