AMC : नगर : महापालिकेने (AMC) एप्रिल ते जून या सर्वसाधारण करावरील सवलत (Tax Relief) कालावधीत या वर्षी विक्रमी २७ कोटीची वसुली केली आहे. ३९ हजार ५१८ मालमत्ताधारकांनी (Property Holder) या सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा केला आहे. तसेच, १ जुलैपासून मालमत्ता करावर २ टक्के दंड म्हणजेच शास्ती आकारणी सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
नक्की वाचा : साईभक्तांसाठी मोठी बातमी;शिर्डीतील सर्व दुकानांसाठी आता एकच दरपत्रक
२७.२७ कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर महापालिकेत जमा (AMC)
महापालिकेने एप्रिल व मे महिन्यात संकलित करावर १० टक्के सवलत दिली होती. २३ हजार ४७८ नागरिकांनी व मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन कर भरला. त्यानंतर जून महिन्यात १६ हजार ४० मालमत्ताधारकांनी ८ टक्के सवलतीचा लाभ घेऊन कर जमा केला. या सर्व मालमत्ताधारकांनी जमा केलेल्या २८.१३ कोटींमध्ये ८६.३२ लाखांची सवलत देण्यात आली असून, २७.२७ कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर महापालिकेत जमा झाला आहे. यापूर्वी एप्रिल ते जून महिन्यात २२ कोटी, २४ कोटी रुपये कर वसुलीची नोंद झाली होती. यावर्षी वसुलीचा नवा विक्रम महापालिकेने नोंदवला आहे.