AMC : महापालिकेच्या वसुलीसाठी विशेष मोहीम; दहा पथके नियुक्त

AMC : महापालिकेच्या वसुलीसाठी विशेष मोहीम; दहा पथके नियुक्त

0
AMC : महापालिकेच्या वसुलीसाठी विशेष मोहीम; दहा पथके नियुक्त
AMC : महापालिकेच्या वसुलीसाठी विशेष मोहीम; दहा पथके नियुक्त

AMC : नगर : महापालिकेच्या (AMC) मालकीच्या व सध्या भाडेतत्वावर देण्यात आलेल्या खुल्या जागा, व्यापारी संकुलातील (Business Complex) गाळे, ओटे, शाळा खोल्या, मंगल कार्यालयांच्या सद्यस्थितीचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात आला आहे. १ हजार १६ मालमत्तांपैकी ६८२ गाळे, जागांचे करारनाम्यांची मुदत संपुष्टात आली आहे. तसेच, बहुतांश भाडेकरूंकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी (Overdue) आहे. ही रक्कम सुमारे २५ कोटी पेक्षा अधिक असून थकबाकी वसुलीसाठी उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मार्केट विभागाची दहा पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

नक्की वाचा : ‘मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात’, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया  

एकूण थकबाकी २५ कोटीहून अधिक

महापालिकेत आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मार्केट विभागाकडून तयार करण्यात आलेला सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. शहरात महापालिकेची ३३ व्यापारी संकुले आहेत. त्यातील ७४२ गाळे भाड्याने दिलेले आहेत. तसेच, ७४ खुल्या जागा, सात शाळांमधील ८२ वर्ग खोल्या, दोन मंगल कार्यालये, तीन ठिकाणी पे अँड पार्कसाठी जागा व दोन व्यायाम शाळा भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. त्यातील ६८२ भाडेकरूंचे करार संपुष्टात आलेले आहेत. १६१ गाळ्यांमध्ये पोटभडेकरु आहेत. यासह १३० गाळ्यांमध्ये परस्पर फेरबदल करण्यात आल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. या भाडेकरूंकडे मोठ्या प्रमाणात थकबाकीही आहे. एकूण थकबाकी २५ कोटीहून अधिक आहे.

अवश्य वाचा :  ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे

परस्पर बदल करणाऱ्यांना ५० हजार रूपये दंड (AMC)

ज्या गाळेधारकांनी परस्पर बदल केले आहेत, त्यांना ५० हजार रूपये दंड करण्यात येणार आहे. मुदत संपलेल्या व थकबाकीदार गाळेधारकांना गाळे नुतनीकरण करून घेण्यासाठी ही संधी आहे. या संधीचा लाभ घेऊन तत्काळ थकबाकी भरावी व करार नुतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.


अनेक गाळेधारकांनी महापालिकेच्या करारनाम्याचे उल्लंघन करून परस्पर पोट भाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. अशा गाळेधारकांनी थकीत रक्कम भरून करार नुतनीकरण न केल्यास त्यांच्यावर कारवाई करून गाळे जप्त करण्यात येणार आहेत. त्यानंतर लिलाव करून गाळे पुन्हा भाड्याने दिले जातील, असा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.