AMC : नगर : शहरात महापालिकेच्या (AMC) असलेल्या विविध गाळे व वर्ग खोल्यांची थकबाकी २५ कोटींवर पोहोचली आहे. संधी देऊनही गाळेधारक थकबाकी भरत नसल्याने महापालिकेने कठोर कारवाई (Strict Action) सुरू केली आहे. मध्य शहरातील गंज बाजार येथील गाळेधारक व ओटे धारकांकडे सुमारे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. या ठिकाणी १४१ गाळे व ओटे असून त्यापैकी ६५ जणांना महापालिकेने जप्तीच्या नोटीसा (Confiscation Notice) बजावल्या आहेत.
नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत
गाळेधारकांकडे तीन कोटीची थकबाकी
गंज बाजार भाजी मार्केट व व्यापारी गाळ्यांमध्ये १४२ गाळेधारक व ओटे धारक आहेत. त्यातील एका गाळ्याची हस्तांतरण प्रक्रिया झालेली आहे. उर्वरित १४१ गाळे धारकांचे करारही संपुष्टात आलेले आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस महापालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे गाळेधारकांनी पैसे जमा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, अद्यापही येथील गाळेधारकांकडे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेने एप्रिल व मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्व माहिती संकलित करण्यात आली आहे. गाळेधारक वारंवार संधी देऊनही थकबाकी भरत नसल्याने सदर गाळे ताब्यात घेण्याबाबत कारवाई सुरू केली आहे. कारवाई झाल्यानंतर हे गाळे पुन्हा लिलाव करून दिले जाणार आहेत.
अवश्य वाचा : लाल किल्ल्याच्या सुरक्षेत गंभीर चूक,किल्ल्याच्या आत पोहोचला डमी बॉम्ब;सात पोलीस निलंबित
संपूर्ण थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई (AMC)
१४१ गाळेधारकांपैकी सुमारे ८० ओटे धारक आहेत. तसेच इतर गाळेधारक आहेत. यातील ६५ जणांना महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलमानुसार जप्ती कारवाई नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांच्या आत थकबाकीदारांनी संपूर्ण थकबाकी न भरल्यास त्यांच्यावर जप्ती कारवाई करून ओटे व गाळे ताब्यात घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेने वारंवार थकबाकी भरण्याची संधी दिलेली आहे. तरीही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने उचलले आहेत.