AMC : महापालिकेकडून पुन्हा शास्ती माफीचा निर्णय; ३१ मार्चपर्यंत लाभ घेता येणार

AMC : महापालिकेकडून पुन्हा शास्ती माफीचा निर्णय; ३१ मार्चपर्यंत लाभ घेता येणार

0
AMC : नगर महापालिकेवर प्रशासक नेमण्याचे आयाेगाचे आदेश
AMC : नगर महापालिकेवर प्रशासक नेमण्याचे आयाेगाचे आदेश

AMC : नगर : महापालिकेकडून (AMC) वारंवार शास्ती माफीचा निर्णय घेतला जाताे. परंतु, मालमत्ताधारक (Property Owner) त्याला काही दाद देताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा महापालिका आयुक्त डाॅ. पंकज जावळे (Dr. Pankaj Jawle) यांनी ७५ टक्के माफी जाहीर केली आहे. मालमत्ताधारकांना १६ ते ३१ मार्चपर्यंत शास्ती माफीचा लाभ घेता येणार आहे. ३१ मार्चनंतर मात्र थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

हे देखील वाचा : लाेकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; नगर जिल्ह्यात कधी होणार मतदान जाणून घ्या…

मालमत्ता धारकांकडे २०० कोटींची थकबाकी

मालमत्ता धारकांकडे २०० कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने १४ फेब्रुवारीपर्यंत मालमत्तांची जप्ती आणि नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम सुरू केली होती. गेल्या महिन्याभरातून वसुली कर्मचाऱ्यांनी १०५९ मालमत्ताधारकांवर कारवाई केली. मात्र, वसुली अवघी तीन कोटी झाली. थकबाकीच्या तुलनेत ही वसुली अगदी नगण्य आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी! राज्यातील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड अनिवार्य

महापालिकेचा कर वसुलीकडे भर (AMC)

दुसरीकडे महापालिकेची सर्व भिस्त ही मालमत्ता करावर अवलंबून असते. आता महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे महापालिकेने कर वसुलीकडे भर दिला आहे. आयुक्तांनी ७५ टक्के शास्ती माफी देऊन करदात्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. नागरिक या संधीचा किती फायदा घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. यावरही मालमत्ताधारकांनी शास्तीमाफी देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केल्यास ३१ मार्चनंतर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here